संजय राऊतांना धक्का! राऊतांशी संबंधित सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची ईडीकडून चौकशी सुरू

खासदार संजय राऊत यांच निकटवर्ती समजले जाणारे सुजीत पाटकर यांची ईडीकडून मुंबई कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या चौकशी नंतर आता पुढील चौकशीला कोणाला बोलवणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

संजय राऊतांना धक्का! राऊतांशी संबंधित सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची ईडीकडून चौकशी सुरू
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 3:54 PM

मुंबईः शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. मात्र, आता आमच्यात कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत असा खुलासा काही दिवसांपूर्वी सुजित पाटकर (Sujit Patkar) यांनी केला होता. त्यावेळी किरीट सोमय्या, नरायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर बेछूट आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित मनी लॉडरिंग प्रकरणी राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

या ईडी प्रकरणामुळे पुन्हा एकदा संजय राऊतांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. सुजीत पाटकर यांच्याबरोबरच स्वप्ना पाटकर यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

सुजित पाटकर यांची तीन तास चौकशी

सुजित पाटकर यांना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळेच त्यांना ईडीकडून त्रास दिला जात असल्याचे बोलले जात आहे. मागील एका प्रकरणातही त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी आपले आणि संजय राऊत यांचे कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते, मात्र आता पुन्हा एकदा सुजीत पाटकर यांची ईडीकडून चौकशी लावल्याने संजय राऊत यांच्यासह अनेकांना धक्का बसला आहे. त्यांची सध्या चौकशी सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे.

मुंबईत सुजित पाटकर यांची चौकशी

खासदार संजय राऊत यांच निकटवर्ती समजले जाणारे सुजीत पाटकर यांची ईडीकडून मुंबई कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या चौकशी नंतर आता पुढील चौकशीला कोणाला बोलवणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रवीण राऊत यांच्या प्रकरणात संजय राऊत यांचं नाव

खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि उद्योजक प्रवीण राऊत यांच्यासह दोघा निकटवर्तीयांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी बेनामी जमिनीप्रकरण आणि ठाणे आणि रायगडमधील काही मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली होती, या कारवाईमुळेही संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली होती.

पाटकर यांच्या घरी याधीही चौकशी

सुजित पाटकर यांच्या घरी याआधीही चौकशी करण्यात आली होती, त्यावेळी त्यांच्या पत्नी आणि वर्षा राऊत यांच्याबद्दलच्या आर्थिक व्यवहाराबाबत मोठी चर्चा करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांच्या कंपनीमध्ये संजय राऊत यांच्या मुली डायरेक्टर कशा असा सवाल राणे आणि किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यावेळीही मोठी खळबळ माजली होती. त्यामुळे आज पुन्हा एकदा पाटकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याने संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. यावेळी पाटकर यांच्याव्यतिरिक्त ईडीने आणखी काही लोकांना आज ईडीने चौकशीला बोलावलं असल्याची चर्चा आहे.

अलिबागमधली जमीन आणि इतर व्यवहारसबंधी चौकशी

खासदार संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांच्या मागे ईडीकडून चौकशी लावल्यानंतर सुजीत पाटकर यांच्या कंपनीत संजय राऊत यांच्या मुली डायरेक्टर कशा असा सवाल उपस्थित करून राऊत यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी वर्षा राऊत आणि सुजीत पाटकर यांच्यामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारावरूनही मोठी राळ उडालेली होती. त्याबरोबरच त्यांच्या 50 एकर जमिनीबाबतही चौकशी करण्याची मागणी नारायण राणे आणि किरीट सोमय्यांनी केली होती, त्यावेळी त्यांच्या जमिन व्यवहारावरुन संजय राऊत आणि संजय पाटकर यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.