Mega Block : आज मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर रेल्वेवरच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या कशी असेल लोकलसेवा

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी सेक्शनमध्ये विशेष गाड्या चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.

Mega Block : आज मेगा ब्लॉक!  मध्य आणि हार्बर रेल्वेवरच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या कशी असेल लोकलसेवा
मेगा ब्लॉकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 6:08 AM

मुंबई : विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांकरीता रविवारी 24 एप्रिल 2022 रोजी मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील. (Sunday mega block on Central and Harbor Railway for technical and maintenance repairs)

हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक

पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत नेरुळ/बेलापूर-खारकोपर रेल्वे मार्ग वगळता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी तथा ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकरीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यान नियमित लोकलसेवा सुरु

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी सेक्शनमध्ये विशेष गाड्या चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. (Sunday mega block on Central and Harbor Railway for technical and maintenance repairs)

इतर बातम्या

Navneet Rana in Mumbai : मी मुंबईची मुलगी, विदर्भाची सून, मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावर नवनीत राणा ठाम, उद्याचा मुहूर्त

Narayan Rane : नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, दोन आठवडे अटक टळली

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.