मोदींना भेटल्यानंतर उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचं होतं, त्या गुप्त बैठकीत काय घडलं?; सुनील तटकरे यांनी सांगितलं पडद्यामागचं ‘राज’कारण
sunil tatkare | भारतीय जनता पक्षासोबत जाण्याबरोबर राष्ट्रवादी पक्षात अनेकवेळा दोन प्रवाह राहिले होते. एक गट नेहमी भाजपसोबत जावे, या विचाराचा आहे. दुसरा प्रवाह हा महाविकास आघाडीचा होता. तेव्हा बसून एकत्र चर्चा करता आली नाही. नंतरच्या कालावधीत अनेक चर्चा होत गेल्या.
मुंबई | दि. 1 मार्च 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची 8 जून 2021 रोजी भेट झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी 12 मागण्या उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केल्या होत्या. त्यात मराठा आरक्षण, ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षण हे सुद्धा मुद्दे होते. या भेटीच्या वेळी अजित पवार आणि अशोक चव्हाणही होते. या भेटीच्या वेळी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात दहा मिनिटे एकट्यात चर्चा झाली. या चर्चाचा तपशील प्रथमच समोर आला आहे. हा तपशील स्वत: संजय राऊत यांनी आपणास सांगितल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
बैठकीसाठी अजित पवार गेले होते
टीव्ही९ मराठीच्या कॉनक्लेव्हमध्ये सुनील तटकरे यांनी अनेक राज उघड केले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्यास तयार झाले होते, असा दावा केला. परंतु संजय राऊत यांनी रोखल्यामुळे तेव्हा उद्धव ठाकरे गेले नाहीत, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या भेटीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजित पवार, अशोक चव्हाणही गेले होते. तेव्हा सरकार सोडावं आणि भाजपसोबत जावं असं उद्धव ठाकरेंना वाटत होतं. स्वत: संजय राऊत यांनीच मला सांगितले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
पक्षात नेहमी दोन प्रवाह
भारतीय जनता पक्षासोबत जाण्याबरोबर राष्ट्रवादी पक्षात अनेकवेळा दोन प्रवाह राहिले होते. एक गट नेहमी भाजपसोबत जावे, या विचाराचा आहे. दुसरा प्रवाह हा महाविकास आघाडीचा होता. तेव्हा बसून एकत्र चर्चा करता आली नाही. नंतरच्या कालावधीत अनेक चर्चा होत गेल्या.
संजय राऊत यांच्या आग्रहखातर एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, अजितदादा सुनील तटकरे यांची बैठक झाली. त्यातही राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबतचे मत व्यक्त केलं. त्यात अनेक चर्चा झाली. त्या सांगणार नाही. पण उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याची चर्चा होती हे राऊत यांनीच सांगितलं.
हे ही वाचा
अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा राज कधी उघड होणार ? सुनील तटकरे यांनी दिले उत्तर