Bullock Cart Race : पुन्हा एकदा भिर्रर्..! सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतीला राज्यात सशर्त परवानगी

महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यती(Bullock Cart Race)ला परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)नं शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. जस्टीस ए. एम. खानविलकर (Justice A M KhanwilKar) आणि सी. टी. रविकुमार (C. T. RaviKumar) यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

Bullock Cart Race : पुन्हा एकदा भिर्रर्..! सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतीला राज्यात सशर्त परवानगी
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 1:08 PM

मुंबई : महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यती(Bullock Cart Race)ला परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)नं शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे.

‘नियमांचे पालन करणार’ राज्य सरकारने यासाठी जोर लावला होता. आता हा निर्णय आल्याने बैलगाडा चालक, मालक, शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे. याचा पाठपुरावा करणारे शिवाजीराव अढळराव पाटील, अमोल कोल्हे यांसह राज्य सरकारमधील विविध मंत्री यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. जी सशर्त परवानगी दिली आहे, त्या नियमांचे पालन होईल, अशी ग्वाहीही देण्यात येत आहे.

2018मध्ये दाखल याचिका जस्टीस ए. एम. खानविलकर (Justice A M KhanwilKar) आणि सी. टी. रविकुमार (C. T. RaviKumar) यांच्या खंडपीठासमोर महाराष्ट्राच्या विशेष याचिकेवरील अंतरिम अर्जावर सुनावणी सुरू होती. 2018मध्ये मुंबई उच्च न्यायालया(Bombay High Court)ने दिलेल्या स्थगिती आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. अॅनिमल वेल्फेअर बोर्ड (Animal Welfare Board) विरुद्ध ए. नागराज (A Nagraj) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या प्रकाशात सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला. खंडपीठाने नमूद केले, की या निकालानंतर तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांनी कायद्यात दुरुस्ती करून जलिकट्टूस परवानगी द्यावी.

‘सर्व राज्यांना नियंम सारखे’

हा पारंपरिक खेळ अनेक वर्षांपासून सुरू आहे, जर तो पारंपरिक खेळ असेल आणि तो महाराष्ट्र सोडून देशभरात खेळला जात असेल, तर ते योग्य नाही, असे निरीक्षण जस्टीस खानविलकर यांनी नोंदवले. फेडरेशन ऑफ इंडियन अ‍ॅनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन (FIAPO)तर्फे अॅड. आनंद ग्रोव्हर यांनी राज्य सरकारतर्फे मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला. राज्य सरकारतर्फे यासंबंधी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यातील महत्त्वाचे मुद्दे खंडपीठासमोर ठेवण्यात आले.

सरकारची बाजू

महाराष्ट्र सरकारने म्हटले, की राज्यात बैलगाडी शर्यतींवर बंदी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात 2017मध्ये बंदी उठवण्यास नकार दिला होता. तर इतर दोन राज्यांच्या (कर्नाटक, तामिळनाडू) संबंधित स्पर्धांवर कोणतीही स्थगिती नाही. गेल्या तीन वर्षांपासून हे प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्यात आल्यापासून इतर राज्यांत मात्र अशा शर्यती होत आहेत. त्यामुळे ही परवानगी मिळावी, असे याचिकेत म्हटले.

MSRTC Strike: निलंबित झालेले कर्मचारी बडतर्फ होऊ शकतात, सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही; अनिल परब यांचा इशारा

दरेकरांनी चक्क 60 दिवस केली मजुरी, 25 हजार 750 रुपयांचा मिळाला मेहनताना; सहकार विभागाच्या नोटीसमधून फुटले बिंग

कोकण रेल्वे मार्गावर धावणार ख्रिसमस स्पेशल ट्रेन; प्रवाशांना मोठा दिलासा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.