AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : धनंजय मुंडेंकडून अजित पवारांचे स्वागत, इकडे लाडक्या बहिणीची मोठी मागणी, बीड दौर्‍यात दादा निर्णय घेतील?

Supriya Sule Dhananjay Munde Ajit Pawar : अजित पवार हे पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात DPDC ची बैठक होत आहे. त्यापूर्वी विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काहूर माजवले आहे.

Supriya Sule : धनंजय मुंडेंकडून अजित पवारांचे स्वागत, इकडे लाडक्या बहिणीची मोठी मागणी, बीड दौर्‍यात दादा निर्णय घेतील?
सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Jan 30, 2025 | 11:32 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच बीडमध्ये नेत्यांसह कार्यकर्त्यांची शाळा घेतली. कुठलेही वेडेवाकडे प्रकार सहन करणार नाही, असा सज्जड दमच त्यांनी भरला. आपआपलं चारित्र्य स्वच्छ ठेवा, प्रतिमा चांगली ठेवा असा कानमंत्र त्यांनी दिला. त्यातच आता विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काहूर माजवले आहे. भाजपा आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्यासह आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. थोड्याच वेळात डीपीडीसीची बैठक होत आहे. ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. त्यात मुंडे यांच्याविरोधात रान पेटण्याची शक्यता आहे.

घोटाळ्याची माहिती सरकारने द्यावी

सरकारला आपले काही प्रश्न असल्याचे सुळे म्हणाल्या. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ५१ दिवस झाले तरी एक खूनी फरार आहे. बीडमध्ये पीकविमा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पिक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे आहेत, त्याविषयीची कबुली सध्याच्या कृषीमंत्र्यांनी दिली आहे. पीकविमा आणि हार्वेस्टर हा कुठे कुठे झाला आहे, याची सर्व माहिती राज्य सरकारकडे आहे ती त्यांनी समोर आणावी असे त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

अंजली दमानियांनी केलेल्या आरोपावर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री निर्णय घेतला आहे, या ऑफिस ऑफ प्रॉफिट आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते मी पाहणार आहे. सुरेश धस यांनी केलेल्या आरोपावर काय निर्णय घेणार याकडे आपले लक्ष असल्याचे त्या म्हणाल्या. पिक आणि हार्वेस्टर याबाबत आजच्या बीड येथील डीपीडीसी मध्ये चर्चा झाली पाहिजे. सर्व प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

नैतिकतेवर राजनामा झाला पाहिजे

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा नैतिकतेवर राजनामा झाला पाहिजे, अशी मागणी केली. दादा बीडच्या दौऱ्यावर असतानाच सुळे यांनी पुन्हा ही मागणी केली आहे. अंजली दमानिया यांनी सर्व कागद दिले आहेत,मी ही ट्विट करणार आहे,मी ही पार्लमेंट मध्ये हा विषय मांडणार आहे महाराष्ट्रासाठी आम्ही पार्लमेंट मध्ये न्याय मागणार आहोत. भाजप आणि शिंदे यांच्या खासदारांची दिल्लीत भेट घेणार, सगळ्या बाजूला ठेवून एकत्र सर्वांनी लढलं पाहिजे. अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.