शरद पवार वडील म्हणून कसे आहेत? सुप्रिया सुळे म्हणाल्या….

शरद पवार हे नेते म्हणून खूप ग्रेट आहेत. पण ते एक वडील म्हणून कसे आहेत? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांनी सांगितलेली एक मोलाची गोष्ट देखील सांगितली.

शरद पवार वडील म्हणून कसे आहेत? सुप्रिया सुळे म्हणाल्या....
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 7:30 PM

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या दोन महिन्यांमध्ये काही अनपेक्षित अशा घटना घडल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे पक्षात मोठी फूट पडलीय. पक्षफुटीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हार मानलेली नाही. अजित पवार यांना जवळपास 40 आमदारांनी पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीचं प्रकरण आता निवडणूक आयोगात गेलंय. विशेष म्हणजे शरद पवार अजूनही परिस्थितीशी संघर्ष करत आहेत. ते वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करुन सभा घेत आहेत. ते भाजपवर सडकून टीका करत आहेत.

शरद पवार एक नेते म्हणून राजकारणाच्या मैदानातले कसलेले पैलवान आहेत. पण ते वडील म्हणून नेमके कसे आहेत? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत. त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. सुप्रिया सुळे यांनी ‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाला मुलाखत दिली. या मुलाखतीचा प्रोमो शेअर करण्यात आलाय. यामध्ये त्यांना शरद पवार वडील म्हणून कसे आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

 शरद पवार यांनी सांगितलेली ‘ती’ मोलाची गोष्ट कोणती?

“शरद पवार खूप बोलत नाहीत. कमी बोलतात. मी ज्यादिवशी पहिल्यांदा लोकसभा निवडून गेले, तेव्हा मला घरातून जाताना, मी आमच्या दिल्लीच्या ‘6-जनपत’ या घरातून निघाले तेव्हा मला ते एक गोष्ट म्हणाले की, आज तू पहिल्यांदा गेट नंबर 1 ने लोकसभेची खासदार म्हणून चालली आहेस. आयुष्यभर एक लक्षात ठेव, ही जी गेट नंबर एकच्या पायरी आहे ती तुला चढण्यासाठी संधी मिळाली ती फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांमुळे मिळाली. तू ही पायरी चढताना मतदारांना लक्षात ठेवशील तोपर्यंत ही पायरी तुला चढता येईल. ज्यादिवशी तू मतदारांना विसरशील त्यादिवशी तुला ही पायरी चढता येणार नाही”, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली.

सुप्रिया सुळे यांचा यशवंतराव चव्हाण यांना फोन

यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना फोन लावत एकतर्फी संवाद साधला. “हॅलो! नमस्कार चव्हाण साहेब, मी सुप्रिया बोलतेय. मी खरंतर तुम्हाला माफी मागायला फोन केला. कारण आम्ही जे राजकारण आणि समाजकारण करतोय ते तुमच्या नावाने, विचाराने, आशीर्वादाने करतो. पण आज महाराष्ट्र प्रचंड अस्वस्थ आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“तुम्ही महाराष्ट्राचा जो मंगल कलश आणला, तुमचे विचार घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न आम्ही सगळेच करतोय. पण त्याच्यात आज महाराष्ट्र देशामध्ये अव्वल नंबरवर नाहीय याचं मला फार भयंकर दु:ख होतं. तुमच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे, तो आज नाहीय. तो प्रचंड अस्वस्थ आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.