वायुवेगाने मन लेकीकडे धावतंय पण… रणरागिणीचा लढाऊबाणा का गळून पडला?; सुषमा अंधारे यांची मन हेलावणारी पोस्ट

| Updated on: Feb 27, 2023 | 7:21 AM

लाडक्या लेकीचा म्हणजे कब्बूचा वाढदिवस असूनही त्यांना वेळेत पोहोचता आलं नाही. त्यामुळे त्यांच्या मनाची घालमेल झाली. ही घालमेल त्यांनी फेसबुक पोस्टमधून व्यक्त केलीय. मनाला हेलावणारीच अशीही पोस्ट आहे.

वायुवेगाने मन लेकीकडे धावतंय पण... रणरागिणीचा लढाऊबाणा का गळून पडला?; सुषमा अंधारे यांची मन हेलावणारी पोस्ट
sushma andhare
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राजकारणी मग तो पुरुष असो वा स्त्री… त्यांना आपल्या कुटुंबीयांना वेळ देताच येईल याची काही शाश्वती नाही. ज्या दिवशी कुटुंबासोबत घरी थांबायलाच हवं त्याच दिवशी नेमकं काही तरी काम येतं आणि राजकारण्यांना घराबाहेर पडावं लागतं. कर्तव्यासाठी मोहिमेवर जावंच लागतं. त्यामुळे कुटुंबीयही नाराज होतात. पण त्यापेक्षा आपण घरात नाही. कुटुंबीयांच्या आनंदाच्या… दु:खाच्या क्षणात कुटुंबीयांसोबत नाही या भावनेनं राजकारण्यांची घालमेल होत असते. ठाकरे गटाच्या रणरागिणी आणि कणखर लढाऊ नेत्या सुषमा अंधारे यांची अवस्थाही अशीच झाली. लाडक्या लेकीचा म्हणजे कब्बूचा वाढदिवस असूनही त्यांना वेळेत पोहोचता आलं नाही. त्यामुळे त्यांच्या मनाची घालमेल झाली. ही घालमेल त्यांनी फेसबुक पोस्टमधून व्यक्त केलीय. मनाला हेलावणारीच अशीही पोस्ट आहे. मायलेकीच्या जीवापाड प्रेमाची आणि मातेच्या ममतेची साक्ष देणारीच अशी ही पोस्ट आहे.

सुषमा अंधारे यांची पोस्ट जशीच्या तशी…

शिवगर्जना सप्ताहाच्या सलग सभा सुरु आहेत.. वरळीची सभा संपवून वायुवेगाने मन लेकीकडे धावतंय… पण लोणावळा घाटातील ट्रॅफिक जणू माझा रस्ता अडवून थांबलंय… दीड दोन तासांपूर्वीचा कणखर लढावू बाणा गळून पडलाय… समोरची अजस्त्र वाहनांची अस्ताव्यस्त ट्रॅफिक बघुन “पराधीन जगती पुत्र मानवाचा ” या ओळींची यथार्थता अनुभवतेय…

हे सुद्धा वाचा

12 वाजलेत… लेकीचा वाढदिवस आहे… आत्ता या क्षणाला मी तिच्या सोबत असायला हवं… अर्थात् नसले तरी रुसण्या इतकं फुरंगटून बसण्या इतकं कळतं वय तरी कूठे आहे म्हणा..? ….पण जो वसा हातात घेतलाय तोही तितकाच महत्वाचा…!

आता जी मनाची घालमेल होतेय ती कदाचीत फक्त रुपाली पाटील ठोंबरे ही मैत्रीणच समजू शकेल..! कारण 11 फेब्रुवारीला तिच्या विरूचा वाढदिवस होता. कब्बुपेक्षा फक्त 16 दिवसांनी मोठा आहे तो… अन् त्याच्या वाढदिवसाला इच्छा असूनही कामामुळे रूपाली पोचू शकत नव्हती. वरुन कितीही खमकेपणा दाखवला तरी त्यादिवशी फ्लाईटमध्ये तिचा रडवेला चेहरा अन् आरक्त डोळे तिच्यातल्या व्याकूळ आईचं काळीज डोकावत होतं…

असो भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते.. याक्षणी शिवसैनिकांनी रक्ताच पाणी करुन वाढवलेली शिवसेना बेइमानांच्या कपटजालात अडकली आहे ती सोडवलीच पाहिजे… लेकीचा वाढदिवस शिवसैनिक मामा शहरप्रमूख आनंद गोयल, गजानन थरकुडे, निलेश जठार, अक्षय सागर माळकर हे सगळे आहेतच त्यामुळे फिकर नॉट…

Love you pillu… Mumma loves you lot..
Wish you a very happy birthday Shona…