शेतकऱ्याचा मुलगा की रिक्षाचालक…?; स्क्रीप्ट आणि स्टार कास्टिंग तरी लक्षात ठेवा, असं मुख्यमंत्र्यांना कोण म्हणालं…

शेतकऱ्याच्या पोरांनी मुख्यमंत्री व्हायचं नाही का असं एकनाथ भाऊ म्हणतात. पण ते एकदा म्हणतात रिक्षाचालकाचा मुलगा आहे.

शेतकऱ्याचा मुलगा की रिक्षाचालक...?; स्क्रीप्ट आणि स्टार कास्टिंग तरी लक्षात ठेवा, असं मुख्यमंत्र्यांना कोण म्हणालं...
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 12:32 AM

कोल्हापूरः ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा वेगवेगळ्या मुद्यांनी सध्या गाजते आहे. त्यातच सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका करत त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आजही कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमध्ये झालेली महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.

ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांवर त्या म्हणाल्या की, आमच्याच माणसांनी भिंतीला फट पडण्याची सुरुवात केली नसती तर भाजपची काय हिम्मत झाली असती असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी शिंदे गटात सामील झालेल्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोलही करण्यात आला.

शिंदे गटाकडून अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. शिंदे गटाकडे अनेक नेते जात असल्याने एकनाथ शिंदे यांच्याकडून नेहमी सांगितले जाते की, लोक आमच्या पाठीशी आहेत.

या त्यांच्या दाव्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिसवाल उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या की, लोक पाठीशी आहे म्हणता तर ब्लॅक कमांडो का घेऊन फिरता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

या परिसरातील नेते यड्रावकर हे आता लोकांमध्ये जायची भीती वाटते आहे म्हणून ते समोर येत नाहीत अशी टीकाही यड्रावकर यांच्यावर करण्यात आली.

शेतकऱ्याच्या पोरांनी मुख्यमंत्री व्हायचं नाही का असं एकनाथ भाऊ म्हणतात. पण ते एकदा म्हणतात रिक्षाचालकाचा मुलगा आहे. त्यावरुनही अंधारे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

त्या म्हणाल्या की, हे जर शेतकरी असतील तर कोणता शेतकरी शेतात चार्टट प्लेन घेऊन उतरतो असा सवाल उपस्थित करुन स्क्रीप्ट आणि स्टार कास्टिंग तरी लक्षात ठेवा असा जोरदार टोलाही त्यांनी शिंदेंना लगावला.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.