सुषमा अंधारे यांचा बदला, 4 कीर्तनकारांचे थेट व्हिडीओच दाखवले, पाहा Tv9 चा स्पेशल रिपोर्ट
अंधारेंनी पहिल्यांदा प्रत्युत्तर दिलं ते कीर्तनकार सुनीता आंधळे यांना. सुनीता आंधळे यांचा टीकटॉक व्हिडीओच अंधारेंनी भर सभेत दाखवला.
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची जुनी वक्तव्ये व्हायरल झाल्यानंतर राज्यातल्या काही कीर्तनकारांनी सुषमा अंधारेंवर टीका केली होती. त्यावर सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. अंधारेंनीही टीका करणाऱ्या त्या 4 कीर्तनकारांचे जुने व्हिडीओ बाहेर काढले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळच्या सभेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी लाव रे तो व्हिडीओची मालिका सुरु केली. संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल सुषमा अंधारेंनी केलेल्या एका विधानावर वारकरी संप्रदायातल्या काही जणांनी आक्षेप घेतला होता. अंधारेंविरोधात राज्यभर आंदोलनही झालं होतं. त्यालाच आता अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय.
अंधारेंनी पहिल्यांदा प्रत्युत्तर दिलं ते कीर्तनकार सुनीता आंधळे यांना. सुनीता आंधळे यांचा टीकटॉक व्हिडीओच अंधारेंनी भर सभेत दाखवला.
सुषमा अंधारेंच्या टार्गेटवरचं दुसरं नाव होतं. कीर्तनकार शिवलीला पाटील यांचं. अंधारेंनी शिवलीला पाटील यांचा बिग बॉसमधला व्हिडीओच बाहेर काढला.
अंधारेंनी शिवलीला पाटील यांचा फक्त बिग बॉसमधला व्हिडीओच लावला नाही. तर त्यांच्या प्रॉपर्टीचीही माहिती दिली.
सुषमा अंधारेंचं तिसरं टार्गेट होतं. ते महेश महाराज मडके. महेश महाराज मडकेंनीच सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती. या सभेत अंधारेंनी महेश महाराज मडकेंवर टीका केली.
संत ज्ञानेश्वरांबद्दल अंधारेंनी केलेल्या वक्तव्यावरुन बंडातात्या कराडकर यांनीही सुषमा अंधारेंवर टीका केली होती. त्यालाही अंधारेंनी बंडातात्यांचा जुना व्हिडीओ लावून प्रत्युत्तर दिलं.
कीर्तनकार सुनीता आंधळे…महेश महाराज मडके, शिवलीला पाटील आणि बंडातात्या कराडकर…
आपल्यावर आरोप करणाऱ्या प्रत्येकाचा जुना व्हिडीओ बाहेर काढून सुषमा अंधारेंनी पलटवार केलाय…
अंधारेंनी दिलेल्या या प्रत्युत्तरानंतर कीर्तनकार काय भूमिका घेणार हेच पाहावं लागेल.