अमृता वहिनींना मी कोणत्या अँगलने त्यांच्यासारखी वाटत असेल बरे?, सुषमा अंधारे यांचा सवाल; पोस्ट होतेय व्हायरल

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि अमृता फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सुषमा अंधारे यांनी सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ शेअर करून त्यांच्यावर टीका केली आहे.

अमृता वहिनींना मी कोणत्या अँगलने त्यांच्यासारखी वाटत असेल बरे?, सुषमा अंधारे यांचा सवाल; पोस्ट होतेय व्हायरल
amruta fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 8:37 AM

मुंबई : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे या माझ्यासारख्या दिसतात, असं अमृता फडणवीस मध्यंतरी म्हणाल्या होत्या. अमृता फडणवीस यांच्या या विधानावरच अंधारे यांनी सवाल केला आहे. अमृता वहिनींना मी कोणत्या अँगलने त्यांच्या सारखी वाटत असेल बरे?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. हा सवाल करतानाच सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांच्या मराठी उच्चारांवरही टीका केली आहे. अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही टीका केली आहे. तसेच अमृता फडणवीस यांचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

अमृता फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावरून सुषमा अंधारे यांनी अमृता यांच्यावर टीका केली आहे. अमृता वहिनींना मी त्यांच्यासारखी वाटते असं त्या जाहीरपणे एका मुलाखती दरम्यान म्हणाल्या. मी सतत विचार करत होते की मी त्यांना कोणत्या अँगलने त्यांच्यासारखी वाटत असेल बरं? कारण दिसायला तर त्या निश्चितपणे माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. श्रीमंत ही आहेत. बाकी मला नरडं आहे त्यांना गळा आहे. मग काय साधर्म्य असेल आमच्यामध्ये?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांना टोला

मग मला कधीतरी वाटलं की कदाचित भाषा प्रभुत्व हे दोघीतलं साम्य असेल का? पण छे ! कालची मुलाखत आणि त्यातलं त्यांचं कॉन्टिनेन्टल उच्चारात मराठी ऐकलं अन् खात्री पटली की आमच्यात साम्य असे काहीच असू शकत नाही. पण त्याही पेक्षा मराठी मनाचे मानबिंदू असणारे मराठी भाषेचे पाईक, मराठी वाचवाचा ध्यास घेणारे, वेळप्रसंगी मेडिकल, इंजीनिअरिंग, लॉ ची पुस्तके सुद्धा मराठीत व्हावीत यासाठी कृष्णकुंज चे रान हादरवणारे राज दादा यांना, मी बोल्ली, मला चान्स मिळाली, या टाईपच मराठी ऐकून कानात शिसं ओतल्यासाखं झालं असेल, असा टोलाही अंधारे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

त्या माझ्यासारख्या वाटायच्या

सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्या सुषमा अंधारे याच्याविषयी बोलताना दिसत आहेत. सुषमा अंधारे या आधी मला माझ्या सारख्या वाटायच्या. जे मनात आहे. ते ओठांवर. त्या कोणाला घाबरायच्या नाहीत. जे आहे ते बोलायच्या. आता एक बदल झालाय. त्यांना जी स्क्रिप्ट मिळते तसं त्या बोलतात. प्रत्येकाविषयी. त्या आज त्या नाहीयेत. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क आहे. तिथे लक्ष देण्याची गरज आहे, असं अमृता फडणवीस बोलताना दिसत आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.