‘राज ठाकरे हा माझा अजिबात विषय नाही, महायुतीने माझा धसका घेतलाय’, सुषमा अंधारेंचा घणाघात

"मी त्यांना मानतही नाही त्यांना माझ्यावर बोलले म्हणून माझा हिसका दाखवला. मी त्यांच्यावर बोलतही नाही. माझं टार्गेट हे इथले कळसूत्री बाहुल्या हलवणारे फडणवीस यांना टार्गेट आहे", असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.

'राज ठाकरे हा माझा अजिबात विषय नाही, महायुतीने माझा धसका घेतलाय', सुषमा अंधारेंचा घणाघात
सुषमा अंधारेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 10:47 PM

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे हा माझा अजिबात विषय नाही. पण अडचण काय झाली, त्यांना जी सुपारी मिळाली होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिली सुपारी माझ्या नावाची होती. महायुतीने माझा धसका घेतलाय. राज ठाकरे माझं कधीही टार्गेट नव्हतं”, असं सुषमा अंधारे म्हणाले. “मी त्यांना मानतही नाही त्यांना माझ्यावर बोलले म्हणून माझा हिसका दाखवला. मी त्यांच्यावर बोलतही नाही. माझं टार्गेट हे इथले कळसूत्री बाहुल्या हलवणारे फडणवीस यांना टार्गेट आहे”, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.

यावेळी सुषमा अंधारे यांनी शालिनी ठाकरे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. “या बाई कोण आहेत याची मला माहितीही नाही. मी बोलल्यानंतर जसा स्प्रे मारल्यावर किडे बाहेर येतात. तडफडतात तशी तडफड उडाली आहे. त्यांच्या अतृप्त आत्म्याला शांती मिळो, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

‘किरीट सोमय्या यांनी यामिनी जाधव यांची माफी मागावी’

“शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यावर मी टीका केली नाही. मी त्यांना प्रश्न विचारले आहेत. त्यांच्यावर आरोप करणारे कोण होते? किरीट सोमय्या होते. यामिनी जाधव गुन्हेगार नसतील तर किरीट सोमय्या यांनी यामिनी जाधव यांची माफी मागावी. अथवा यामिनी जाधव यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा. आम्हाला मग कळेल, त्यानंतर आम्हाला कळेल काय खरं आणि काय खोटं ते?”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

शरद पवार यांची महायुतीवर टीका

दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महायुतीवर निशाणा साधलाय. “मुंबईमध्ये आज दुःखाचा दिवस आहे. मुंबईमध्ये आज एक मोठं होर्डिंग कोसळलं. त्यात अनेक लोक हे मृत्युमुखी पडले आहेत. आपल्या देशातील निवडणुकीच औतसुक्य आहे. कारण या देशातील लोकशाही ही टिकली पाहिजे म्हणून सर्व देश आपल्याकडे पाहत आहेत. मोदी यांच्यावर टीका करतो म्हणून अरविंद केजरीवाल, संजय राऊत, अनिल देशमुख यांना तुम्ही तुरुंगात टाकलं. ही निवडणूक साधी सोपी नाही. काही चूक करायची नाही. नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला भोगावं लागेल. भाजप तडीपार हे तुम्ही बोलत आहात. त्यावर आता काम करावं लागेल आणि संजय दिना पाटील यांना निवडून द्यावं लागेल”, अशी टीका शरद पवार यांनी केली.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.