नवी मुंबईजवळ अज्ञात पॅराशूट उतरल्याने गूढ वाढलं!
नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली परिसरात अज्ञात पॅराशूट उतरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पॅराशूटमधून एक विदेशी महिला उतरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दहशतवाद विरोधी पथकाकडून या संपूर्ण परिसराचा तपास सुरु करण्यात आला आहे. नवी मुंबईतील घणसोली सेक्टर-15 येथील पामबीच मार्गाजवळील परिसरात ही घटना घडली. नेमकं काय घडलं? शनिवारी (2 फेब्रुवारी 2019) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारस […]
नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली परिसरात अज्ञात पॅराशूट उतरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पॅराशूटमधून एक विदेशी महिला उतरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दहशतवाद विरोधी पथकाकडून या संपूर्ण परिसराचा तपास सुरु करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील घणसोली सेक्टर-15 येथील पामबीच मार्गाजवळील परिसरात ही घटना घडली.
नेमकं काय घडलं?
शनिवारी (2 फेब्रुवारी 2019) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारस नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक पॅराशूट उतरलं. या पॅराशूटमधून एक परदेशी महिला उतरल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेची दहशतवाद विरोधी पथकाने गंभीर दखल घेतली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने घणसोलीतील या संपूर्ण परिसराची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे.
पॅराशूट कुणाचं होतं, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार त्यातून उतरलेली परदेशी महिला कोण, ती कुठे गेली असे अनेक प्रश्न या घटनेने उपस्थित झाले असून, या घटनेमुळे गूढही वाढले आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून या संपूर्ण घटनेचा तपास सुरु झाला आहे. या तपासात काय उघड होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कुठे आहे घणसोली?