निवृत्ती बाबर, मुंबई, 15 डिसेंबर | ऑनलाइन जेवण मागवणाऱ्या मुंबईतील एका व्यक्तीने कमाल केली आहे. या खवय्याने वर्षात ४२ लाखांहून अधिक रुपये ऑनलाईन जेवणावर खर्च केले आहे. स्विगीकडून ही माहिती “हाऊ इंडिया स्विगी इन २०२३” या अहवालात दिली आहे. स्विगीकडून प्रत्येक वर्षाच्या अखेरीस गेल्या १२ महिन्यांत घडलेल्या खास गोष्टींची माहिती दिली जाते. त्यात गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एका व्यक्तीने या वर्षभरात जेवणाच्या ऑर्डरवर ४२ लाख ३ हजार रुपये खर्च केले आहेत. अर्थात त्या व्यक्तीचे नाव स्विगीकडून जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु या अहवालानंतर मुंबईतील त्या खवय्याची चर्चा चांगलीच होत आहे. कारण त्याने स्विगीसह इतर ठिकाणावरुन जेवण मागवले असण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन फुड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी या प्लॅटफॉर्मवर १० हजारांहून अधिकच्या ऑर्डर चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद येथील व्यक्तींकडून आल्या आहेत. सर्वाधिक मागणी केक, गुलाब जामून, पिझ्झा, वेगवेगळे खाद्यपदार्थांना झाली आहे. परंतु या सर्वांत बिर्याणीला सर्वाधिक मागणी आहे. 5.5 प्लेट चिकन बिर्याणी ऑर्डर झाल्यावर एक व्हेज बिर्याणीची ऑर्डर दिले जाते.
भारतीयांमध्ये बिर्याणीला सर्वाधिक मागणी आहे. चिकन बिर्याणीला वर्षभरात सर्वाधिक मागणी आहे. वर्षभरात प्रत्येक सेंकदाला 2.5 जण बिर्याणीची ऑर्डर देत आहे. यामुळे स्विगीच्या चार्टमध्ये बिर्याणी सर्वोच्च शिखरावर आहे. सलग आठव्यांदा बिर्याणीची सर्वाधिक मागणी नोंदवण्यात आली. हैदराबादमधील प्रसिद्ध डिश बिर्याणी देशभरात खवय्यांसाठी सर्वाधिक मागणी असणारी आहे. वर्षभरात 1,633 जणांनी हे ऑर्डर केले आहे. दिवसाला चार प्लेट हा आकडा आहे.
भारत पाकिस्तान सामना सुरु असताना बिर्याणी क्रेज सर्वाधिक होती. यावेळी चंदीगडमधील एका परिवाराने 70 प्लेट ऑर्डर केली होती. झाशीमध्ये एका व्यक्तीने 269 वस्तूंची ऑर्डर दिली होती. तसेच भुवनेश्वरमधील एका परिवाराने 207 पिझ्झा एकाच दिवशी मागवले. दुर्गा पूजा सुरु असताना गुलाब जामूनची सर्वाधिक ऑर्डर झाली. यावेळी 77 लाखांपेक्षा जास्त गुलाब जामून मागवण्यात आली. या नऊ दिवसांत मसाले डोसाला सर्वाधिक मागणी होते.