हिंदू महिला, मुलींना जबरदस्तीने हिजाब घालायला लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा; दरेकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

संघटितपणे अधार्मिक कृत्य पार पाडण्याची सक्ती करणारे कृत्य नागपूर येथे घडले. या घटनेची माहिती मिळताच विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या बाबत गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

हिंदू महिला, मुलींना जबरदस्तीने हिजाब घालायला लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा; दरेकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी
प्रविण दरेकर
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 7:03 PM

मुंबई : सामाजिक शांतता व सलोखा बिघडवणारे, दोन समाजात तेढ निर्माण करणारे, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे, धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच निर्माण करणारे, धमकी देऊन जमाव जमवून संघटितपणे अधार्मिक कृत्य पार पाडण्याची सक्ती करणारे कृत्य नागपूर येथे घडले. या घटनेची माहिती मिळताच विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या बाबत गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करावी तसेच या समाजविघातक कृत्यामागे असलेल्या संघटना व पदाधिकारी यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्धही अशाच प्रकारची फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी दरेकर यांनी पत्राद्वारे केली आहे. (Take action against those who force Hindu women and girls to wear hijab, Pravin Darekar’s demand)

गर्ल्स इस्लामिक फाउंडेशन या जमाते- ए – इस्लामी हिंद (नॉर्थ वेस्ट) गटाने नागपूरमध्ये, ज्या ठिकाणी बाराही महीने पोलिस बंदोबस्त असतो, अशा माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या परिसरात, भररस्त्यात दिवसा ढवळ्या हिंदू महिला व अज्ञान मुलीना धाक दाखवून जबरदस्तीने हिजाब घालण्यास बाध्य करण्याचा प्रयत्न 4 सप्टेंबर रोजी करण्यात आला. हिजाब घातलेल्या साधारण दहा ते पंधरा महिला व काही अंतरावर तेव्हढेच पुरुष एकत्रित येऊन अशा प्रकारचे कायदाविरोधी कृत्य संघटितपणे करत होते. हिंदू महिला व मुलीनी या अमानवी कृत्याला विरोध केल्यानंतर त्यांना धमक्याही देण्यात आल्या. परंतु काही पादचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला व त्या हिजाब घातलेल्या महिला व पुरुष तेथून पसार झाले असल्याचे दरेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरेकर म्हणाले, या सर्व घटनेचे विडिओ चित्रीकरण झाले असून संबंधित गुन्हेगार चित्रीकरणात स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच या महिलांकडून वाटले जाणारे पॅम्पलेट आणि ज्या वाहनांनी हे सर्व लोकं आले होते त्या वाहनांचे वाहन क्रमांक पादचाऱ्यांनी पोलिसांना सुपूर्द केले आहेत. पादचारी व हिंदू महिलांनी या कायदाविरोधी घटनेची नागपूरमधील सदर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन हे कायदाविरोधी कृत्य करणाऱ्यांविरोधात तातडीने गंभीर स्वरूपाच्या संबंधित कलमांन्वये गुन्हे दाखल करावेत. अटक करावी व कायद्यानुसार शिक्षा होईल अशा प्रकारची कठोर कारवाई करावी तसेच या समाजविघातक कृत्यामागे असलेल्या संघटना व पदाधिकारी यांचाही शोध घेऊन त्यांच्याविरुद्धही अशाच प्रकारची फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी दरेकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

इतर बातम्या

बाळासाहेब थोरात म्हणाले, पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली यावं; वडेट्टीवार म्हणतात, बाळासाहेबांची भूमिका योग्यच!

सोमय्यांनी मुश्रीफांविरोधात बत्ती लावली, उद्या ईडीकडे तक्रार नोंदवणार तर परवा केंद्रात तीन ठिकाणी पुरावे देणार

सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे, इतरांच्या पोरांकडे बोट दाखवताना तुमचा मुलगा काय करतो ते पाहा; नवाब मलिकांचा घणाघात

(Take action against those who force Hindu women and girls to wear hijab, Pravin Darekar’s demand)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.