Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे खरंच एनडीएच्या संपर्कात? मातोश्रीवर आता या नेत्यांनी घेतली भेट

लोकसभा निवडणुकीनंतर आता एनडीएकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. या दरम्यान इंडिया आघाडीची देखील बैठक झाली. पण या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. त्यामुळे ते एनडीएच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

उद्धव ठाकरे खरंच एनडीएच्या संपर्कात? मातोश्रीवर आता या नेत्यांनी घेतली भेट
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 10:36 PM

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता एनडीएकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ९ जून रोजी मोदी सरकारचा शपथविधी होणार आहे. दुसरीकडे आता अशी चर्चा आहे की, शिवसेना-यूबीटी नेते उद्धव ठाकरे हे एनडीएच्या संपर्कात आहेत. त्यामुळेच त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली नाही. पण ही चर्चा चुकीची ठरली. कारण त्यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री बंगल्यावर आजा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. या बैठकीला काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. गुरुवारी त्यांनी टीएमसी नेते डेरेक ओब्रायन आणि अभिषेक बॅनर्जी यांचीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली पण या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. पण शिवसेना-यूबीटीच्या वतीने संजय राऊत बैठकीत सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित नसल्याने ते एनडीएमध्ये सामील होतील अशी चर्चा सुरु झाली होती. पण ती चुकीची ठरली. आज उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 9 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 13 जागा जिंकल्या आहेत. महाविकासआघाडीतील आणखी एक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार  गटाला ८ जागांवर विजय मिळाला आहे.

सांगलीतील पराभवाने उद्धव ठाकरे नाराज

सांगली मतदारसंघातून शिवसेना-यूबीटीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाल्याने उद्धव ठाकरे हे नाराज आहेत. ते काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या ठिकाणी अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारली आहे. काँग्रेसने विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याचा दावा केला जात होता. विशाल पाटील हे काँग्रेसचे नेते आहे. ते माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे ते नातू आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना-यूबीटीने सर्वाधिक जागा लढल्यात. पण तरी त्यांना काँग्रेसपेक्षा कमी जागा जिंकता आल्या. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच फूट पडण्याआधी शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.