लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता एनडीएकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ९ जून रोजी मोदी सरकारचा शपथविधी होणार आहे. दुसरीकडे आता अशी चर्चा आहे की, शिवसेना-यूबीटी नेते उद्धव ठाकरे हे एनडीएच्या संपर्कात आहेत. त्यामुळेच त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली नाही. पण ही चर्चा चुकीची ठरली. कारण त्यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री बंगल्यावर आजा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. या बैठकीला काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. गुरुवारी त्यांनी टीएमसी नेते डेरेक ओब्रायन आणि अभिषेक बॅनर्जी यांचीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली पण या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. पण शिवसेना-यूबीटीच्या वतीने संजय राऊत बैठकीत सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित नसल्याने ते एनडीएमध्ये सामील होतील अशी चर्चा सुरु झाली होती. पण ती चुकीची ठरली. आज उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 9 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 13 जागा जिंकल्या आहेत. महाविकासआघाडीतील आणखी एक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाला ८ जागांवर विजय मिळाला आहे.
सांगली मतदारसंघातून शिवसेना-यूबीटीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाल्याने उद्धव ठाकरे हे नाराज आहेत. ते काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या ठिकाणी अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारली आहे. काँग्रेसने विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याचा दावा केला जात होता. विशाल पाटील हे काँग्रेसचे नेते आहे. ते माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे ते नातू आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना-यूबीटीने सर्वाधिक जागा लढल्यात. पण तरी त्यांना काँग्रेसपेक्षा कमी जागा जिंकता आल्या. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच फूट पडण्याआधी शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या.