Tauktae Cyclone : रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावरील 64, तर खाडी किनाऱ्यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा

रायगड जिल्ह्यात उद्या सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Tauktae Cyclone : रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावरील 64, तर खाडी किनाऱ्यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा
तौत्के चक्रीवादळ
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 5:19 PM

रायगड : ‘तौक्ते चक्रीवादळा’चा फटका कोकणातील समुद्र किनाऱ्या लगतच्या गावांना बसण्यास आता सुरुवात झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगडमध्ये समुद्र खवळल्याचं पाहायला मिळतयं. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरील 62, तसंच खाडी किनाऱ्यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात उद्या सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलीय. (Alert to coastal villages in Raigad district on the backdrop of cyclone Tauktae)

ज्याचं घर कच्चं, खराब स्लॅब आणि भिंती आहेत, अशांनी घरात न राहता तत्काळ सुरक्षितस्थळी जावं, असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. आदिवासी भागात किंवा कच्च्या घरात राहणाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करत जवळच्या शाळा किंवा शेल्टर होममध्ये राहावं, अशी सूचना मिळाल्यास तत्काळ घर सोडवं अशी विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांनी केलीय. तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर PWD, NHAL, MSEDCL, MSRDC यांच्या यंत्रणाना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लसीकरण बंद, रुग्णांसाठी उपाययोजना सुरु

कोरोना संकटाच्या काळात ताऊक्ते चक्रीवादळामुळे चिंता अधिक वाढलीय. जिल्हात 59 खासगी आणि सरकारी रुग्णालयात कोविड रुग्ण ऑक्सिजन आणि ICU मध्ये आहेत. तर जिल्ह्यात 10 हजारापेक्षा अधिक कोरोना असल्यानं प्रशासनानं त्याबाबत तयारी सुरु केलीय. पुढील दोन दिवस जिल्ह्यातील लसीकरण बंद राहणार आहे. तसंच हे दोन दिवस फक्त अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा सुरु राहणार आहेत.

हवामान विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन

हवामान विभागाचे अधिकारी के एस होसाळीकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती विषयी माहिती दिली आहे. सिंधुर्गात आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात काही झाडे, विजेचे पोल उन्मळून पडल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर होसाळीकर यांनी सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

किनारपट्टीवरील 68 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं

तौक्ते चक्रीवादळ सध्या सिंधुदुर्गाच्या मालवण किनारपट्टीजवळ आहे. मालवणचा समुद्र सकाळपासून खवळलेला आहे. मालवणच्या किनारपट्टीवर सकाळी अकरा वाजेपासून दोन ते तीन मीटरच्या उंचीपर्यंत लाटा उसळत होत्या. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन देखील सतर्क झालं आहे. जिल्हा प्रशासनाने किनारपट्टीरील 68 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

संबंधित बातम्या : 

Tauktae Cyclone | जम्बो कोव्हिड सेंटरमधील रुग्णांचे स्थलांतर ते रुग्णालयात बॅकअप यंत्रणा, राज्य शासनाची नेमकी तयारी काय?

Tauktae Cyclone: रत्नागिरीच्या देवरुखमध्ये भलमोठं झाडं कोसळलं, तोक्ते चक्रीवादळामुळं वाऱ्यांचा वेग 40 किमी

Alert to coastal villages in Raigad district on the backdrop of cyclone Tauktae

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.