Tauktae Cyclone: चक्रीवादळ राज्यात धडकणार नाही, पण समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग वाढणार, सावध राहण्याच्या सूचना
महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा 'निसर्ग'प्रमाणे थेट परिणाम जाणवणार नाही. | Tauktae Cyclone
मुंबई: अरबी समुद्रातील तौत्के या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोक नाही. ते महाराष्ट्रात धडकणार नाही, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली. तौत्के हे चक्रीवादळ सध्या गोव्याच्या किनारपट्टीपासून 350 किलोमीटर अंतरावर आहे. तेथून हे चक्रीवादळ (Tauktae Cyclone) गुजरातच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होईल. त्यामुळे महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा ‘निसर्ग’प्रमाणे थेट परिणाम जाणवणार नाही. केवळ मुंबई, पालघर, रायगड आणि कोकण परिसरात 16 तारखेला चक्रीवादळच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे शुभांगी भुते यांनी सांगितले. (Tauktae Cyclone will not impact directly in Maharashtra says Meteorological department)
मात्र, आपण या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत आहोत. या चक्रीवादळाची सूचना मिळाली तेव्हा आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रशासनाला दिलेल्या सूचनांचे योग्य पालन झाले. या भागातील सर्व मच्छिमार बोटी समुद्रातून परतल्या आहेत, असे शुभांगी भुते यांनी सांगितले.
कोकण किनारपट्टीवरच्या गावांसाठी पुढचे दोन दिवस सतर्कतेचे
तौत्के चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नसले तरी किनारपट्टीच्या भागात त्याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे चक्रीवादळा संबधी गावोगाव जनजागृती सुरु आहे. मुंबई,कोकण आणि इतर भागात जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस हे महत्वाचे आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी केले आहे.
Tautkae Cyclone Mumbai & around nxt 2 days there could be stormy winds over coast, heavy rains at isol places possible, Very rough sea, Don’t go near beaches. Loose structures stand away.Tall tower construction crane operations, be careful. Treestoo. Pl see IMD updates
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 15, 2021
संबंधित बातम्या:
Tauktae cyclone | मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये जय्यत तयारी, वेळ पडल्यास कोळीवाड्यातील नागरिकांना हलवणार
Tauktae Cyclone | मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, दक्षिण मुंबई, उपनगरात पावसाच्या सरी
(Tauktae Cyclone will not impact directly in Maharashtra says Meteorological department)