क्रिकेटपटूंचा प्रातांचा मुद्दा छेडत बड्या काँग्रेस नेत्याचा कोणाला टोला…

क्रिकेटपटूंचा प्रातांचा मुद्दा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. सचिन सावंत यांनी X वर पोस्ट करत सध्या मुंबईकर असलेल्या चार खेळाडूंची मातृभाषा आणि प्रांत सांगितला आहे. या माध्यमातून सातत्याने परप्रतींयांच्या मुद्दा मांडणाऱ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे.

क्रिकेटपटूंचा प्रातांचा मुद्दा छेडत बड्या काँग्रेस नेत्याचा कोणाला टोला...
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 11:50 AM

टी 20 विश्वचषक स्पर्धेतील विश्वविजेत्या टीम इंडियाचे मुंबईत गुरुवारी जोरदार स्वागत झाले. लाखोच्या संख्येने मुंबईकर क्रिकेटपटूंचे अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरले. आता क्रिकेटपटूंच्या सत्कारासाठी राजकीय चढाओढही सुरु झाली आहे. क्रिकेटपटूंचे अभिनंदन करणारे पोस्टर महायुतीकडून लावण्यात आले आहे. त्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो आहे. त्यावरुन आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

आता क्रिकेटपटूंचा प्रातांचा मुद्दा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. सचिन सावंत यांनी X वर पोस्ट करत सध्या मुंबईकर असलेल्या चार खेळाडूंची मातृभाषा आणि प्रांत सांगितला आहे. या माध्यमातून सातत्याने परप्रतींयांच्या मुद्दा मांडणाऱ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी हा टोला कोणाला मारला आहे, त्याची चर्चा सुरु झाली आहे.

हे सुद्धा वाचा

सचिन सावंत यांनी काय म्हटले?

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देशाला गौरव मिळवून देणाऱ्या आपल्या लाडक्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या मुंबईकरांचा सत्कार करण्यात येणार आहे. याचा आनंद आहे. समस्त मुंबईकर काल या आपल्या हिरोंच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते आणि सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. या मुंबईच्या सुपुत्रांपैकी सूर्यकुमार यादव याचा जन्म गाझीपूर उत्तर प्रदेश आणि यशस्वी जैस्वाल याचा जन्म भदोई, उत्तर प्रदेशचा आहे. मुंबई स्वप्ननगरी आहे. यशस्वीचे यश हे ज्यांचा काही राजकीय पक्ष तिरस्कार करतात त्यांच्यापैकी एका फेरीवाल्याच्या स्वप्नांची पूर्ती आहे. शिवम दुबे याचा जन्म मुंबईत झाला असला तरी त्याचे वडील हे भदोई उत्तर प्रदेशचे आहेत.

मराठी उत्तम बोलणाऱ्या आपल्या लाडक्या रोहितची मातृभाषा तेलगू आहे. मुंबईच्या विकासासाठी व मुंबईचे नाव जगात मोठे करण्यासाठी मराठी माणसाच्या खांद्याला खांदा लावून इतर प्रांतातील लोकांनीही योगदान दिले आहे. तेही मुंबईकर आहेत. त्याचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. आम्हाला तो आहेच! मुंबईकरांमध्ये मराठी परप्रांतीय असे ध्रुवीकरणाचे, द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना आतातरी सुबुद्धी येवो! जे अशा पक्षाची सत्तेसाठी साथ घेतात अशा भाजपालाही सुबुद्धी प्राप्त होवो हीच या आनंदाक्षणी प्रार्थना!

खेळाडूंचा आज विधिमंडळ परिसरात सत्कार

T20 वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघातील मुंबईच्या चार खेळाडूंचा शुक्रवारी महाराष्ट्र विधान भवन संकुलात गौरव करण्यात येणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल हे भारताच्या T20 विश्वचषक संघाचा भाग होते. हे सर्वजण मुंबईचे रहिवासी आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.