Harbour Update : संथ गतीने लोकलसेवा सुरू… हार्बरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, पण वेळापत्रक कोलमडलेलंच

आज पहाटे पहाटे साडे सहाच्या दरम्यान जुईनगर स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक वाशी ते पनवेल दरम्यान थांबली.

Harbour Update : संथ गतीने लोकलसेवा सुरू… हार्बरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, पण वेळापत्रक कोलमडलेलंच
हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, पहाटे पहाटे चाकरमान्यांना फटकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 7:24 AM

मुंबई: जुईनगर स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी ते पनवेल दरम्यान ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने पहाटे पहाटेच चाकरमान्यांना त्याचा फटका बसला आहे. दरम्यान, रेल्वेकडून हार्बरवरील वाहतूकसेवा पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर ही वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, रेल्वेचं वेळापत्रक अजूनही कोलमडलेलेचं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आज पहाटे पहाटे साडे सहाच्या दरम्यान जुईनगर स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक वाशी ते पनवेल दरम्यान थांबली. गेल्या 20 मिनिटांपासून रेल्वे वाहतूक बंद आहे. वाहतूक कोणत्या कारणाने बंद झाली, वाहतूक कधी सुरू होणार याबाबतची कोणतीही माहिती रेल्वेकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे चाकरमानी चांगलेच वैतागले आहेत.

हे सुद्धा वाचा

20 मिनिटांपासून लोकल एकाच जागी थांबून आहे. रेल्वेकडून कोणतीही सूचना देण्यात येत नाही. त्यामुळे लोकल कधी सुरू होणार याची काहीच माहिती मिळत नसल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांच्या संतापाचा पारा चढला आहे.

गेल्या वीस मिनिटांपासून रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने वाशी ते पनवेल दरम्यानच्या स्थानकांवर तुफान गर्दी झाली आहे. तसेच मानखुर्द ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे.

वाहतूक सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने काही चाकरमान्यांनी ट्रान्स हार्बरने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. तर काही चाकरमानी बसच्या दिशेने धावताना दिसत आहेत. तर अनेकजण लोकल सुरू होण्याची वाट पाहत असल्याने त्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.

दरम्यान, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम रेल्वे सुरू केले असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, ही बिघाड कधी दुरुस्त होणार याची माहित देण्यात आलेली नाही.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.