आधी पाल, साप, खेकडा, आता तेजस ठाकरे यांचं मुंबईत नवं संशोधन, गोड्या पाण्यातील माशाची नवी प्रजाती शोधली

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लहान मुलगा तेजस ठाकरे (Tejas Thackeray ) आणि त्यांच्या टीमनं मुंबईतील ब्लाईंड ईल माशाचा ( Blind eel fish) शोध लावला आहे. तेजस ठाकरे यांनी इन्स्टाग्राम पोस्ट लिहून यांसदर्भात माहिती दिली आहे.

आधी पाल, साप, खेकडा, आता तेजस ठाकरे यांचं मुंबईत नवं संशोधन, गोड्या पाण्यातील माशाची नवी प्रजाती शोधली
तेजस ठाकरे आणि टीमनं शोधलेली प्रजाती
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 6:22 PM

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लहान मुलगा तेजस ठाकरे (Tejas Thackeray ) आणि त्यांच्या टीमनं मुंबईतील ब्लाईंड ईल माशाचा ( Blind eel fish) शोध लावला आहे. तेजस ठाकरे यांनी इन्स्टाग्राम पोस्ट लिहून यांसदर्भात माहिती दिली आहे. तेजस ठाकरे, प्रवीणराज जयसिम्हण, अनिल महापात्रा आणि अन्नम पवन कुमार यांच्या टीमनं हे संशोधन केलं आहे. तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर या संशोधनानिमित्त अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तेजस ठाकरे यांची इन्स्टाग्राम पोस्ट

गेल्या काही वर्षांपूर्वी आम्हाला काही प्रजाती मिळाल्या होत्या. कोरोनासंसर्गाच्या काळात आम्ही त्यावर दीर्घकाळ अभ्यास करत होतो. या प्रवासात अनेकदा अप्स अँड डाऊन्स आले. आता आम्ही यशापर्यंत पोहोचलोय, याचा आम्हाला आनंद होत आहे. आम्ही तुमच्या समोर गोड्या पाण्यातील ब्लाईंड ईल माशाची प्रजाती सादर करत आहोत. त्या प्रजातीला रक्थमिच्थिस मुंबा असं नाव दिल्याचं तेजस ठाकरे यांनी सांगितलं आहे. तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्याचं संशोधन अ‌ॅक्वा इंटरनॅशनल जनरल ऑफ इचथायलॉजीमध्ये प्रसिद्ध झालं आहे.

ब्लाईंड इल ही प्रजाती महाराष्ट्र आणि पश्चिम घाटाच्या उत्तर भागात आढळून आली आहे. रक्थमिच्थिस मुंबा हे नाव प्रजाती मुंबईत आढळून आल्यानं आणि मुंबादेवीच्या नावावरुन देण्यात आलं आहे, असंही तेजस ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं केलेल्या संशोधनाबद्दल मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे.

यापूर्वी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध

तेजस ठाकरे यांनी गेल्या वर्षी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला होता. तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकरांच्या टीमने पालींच्या या दुर्मिळ प्रजातींचा शोध लावलेला. कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या होत्या. त्यामुळे पच्छिम घाटातील जैववैविधतेत भर पडली आहे. भारतात वेगवेगळ्या पन्नास पालींच्या प्रजाती आढळतात. त्यात आता डोळ्यांच्या गोलाकार मोठ्या बुबळांच्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरीररचनेमुळे प्राणीतज्ञांचं लक्ष वेधून घेत आहेत.तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी 2014 मध्ये या पालींच्या प्रजातीचा शोध लावला होता. मात्र, गेली पाच वर्षे या दुर्मिळ प्रजातींच्या पालींवर जुणूकीय तसेच इतर पालींपैक्षा या वेगळ्या का आहेत यावर प्राणी शरीर शास्त्रांच्या नियमानुसार अनेक सविस्तर संशोधन करण्यात आलं.

इतर बातम्या:

तेजससोबत फोटोसाठी आग्रह, उद्धव म्हणाले, मला स्टुलावर उभं राहावं लागतं!

तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Tejas Thackeray and his friends discovered New species of blind freshwater eel

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.