इच्छा असेल त्या मुंबईकराला कोरोना चाचणी करण्याची मुभा : आदित्य ठाकरे
इच्छा असेल त्या मुंबईकराला कोरोना चाचणी करण्याची मुभा असल्याचं आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलं आहे ( Aaditya Thackeray on Test for Every Mumbaikar).
मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना इच्छा असेल त्याला कोरोना चाचणी करण्याची मुभा असल्याचं जाहीर केलं आहे ( Aaditya Thackeray on Test for Every Mumbaikar). त्यामुळे आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची शंका असणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला आपल्या शंकेचं समाधान करता येणार आहे. तसेच कोरोनाच्या भीतीत राहणं टाळता येणार आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली.
आदित्य ठाकरे म्हणाले, “‘चेस द व्हायरस’ मुंबई महानगर प्रदेशात राबवली जात आहे. तुमचे सुरक्षा गिअर्स खाली ठेवू नका. मास्क खाली उतरवू नका. आपला कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यावरच भर आहे. मागील काही आठवड्यापासून हे अभियान राबवण्यात येत आहे. लवकरच यांचे निकाल दिसतील.
सर्वाधिक चाचण्याच्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे. आज मुंबईत कोरोनाच्या केवळ 700 रुग्णांची नोंद आहे. आज एकाच दिवसात सर्वाधिक 8 हजार 776 चाचण्या घेण्यात आल्या. मुंबईकरांना इच्छा असेल त्याला चाचणी करण्याची मुभा देण्यात येईल.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
Mumbai will see more testing with chase the virus initiative of the @mybmc . It is also the only city to have liberalised testing and allowed citizens to “test at will”. (2/n)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 28, 2020
आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये मुंबईचाही गौरव केला. नागरिकांना आपल्या इच्छेप्रमाणे कोरोना चाचणीची मुभा देणारं मुंबई हे एकमेव शहर असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
दरम्यान, मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा सोमवारी (27 जुलै) सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1 लाखाहून अधिक होता. यापैकी आतापर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण 81 हजार 944 इतके आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 73 टक्के इतका आहे. सध्या मुंबईत एकूण 21 हजार 812 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांच्या दुपटीचा दर 68 दिवस आहे. तसेच कोव्हिड वाढीचा दर 20-26 जुलैदरम्यान 1.03 टक्के आहे.
हेही वाचा :
वाफ घेतल्याने कोरोना संसर्गाचा धोका कमी, मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या अभ्यासात दावा
अवाजवी बिलांच्या तक्रारीची दखल, मिरा रोडमधील हॉस्पिटलची ‘कोव्हिड’ मान्यता रद्द
पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांकडून लूट, मनसेचा आरोप
Aaditya Thackeray on Test for Every Mumbaikar