Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे डिनोच्या घरी आयुर्वेदिक उपचारासाठी जायचा का? भाजपा आमदाराचे झोंबणारे शब्द
Aaditya Thackeray | भाजपा आमदाराने आदित्य ठाकरे यांच्यावर अंत्यत बोचरी, झोंबणारी टीका केली आहे. त्याने ड्रग्समुक्त महाराष्ट्राची सुरुवात मातोश्रीपासून करा असं म्हटलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी तोंड उघडले, तर तुझ्या मालकाच कुटुंब आर्थर रोड जेलमध्ये असेल, असं या आमदाराने म्हटलं आहे.
मुंबई (महेश सावंत) : “कोरोना नंतर सर्वात गतीने वाढणारी अर्थ व्यवस्था म्हणजे भारत. ह्या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या अनाडी कामगाराला कधीच कळणार नाहीत. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा चढता आलेख उद्धव ठाकरेच्या कारकिर्दीत उबाटा नावाचं छोट मित्र मंडळ झालं आहे. याबाबत संजय राऊतने अग्रलेख लिहावा. तुझ्या सारख्या चवनी लोकांनी ही अवस्था केली” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. “आदित्य ठाकरे डिनोच्या घरी आयुर्वेदिक उपचारासाठी जायचा का? सत्य नारायणाच्या पूजेला जायचा का?” असा सवालही नितेश राणेंनी विचारला. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूरला पूजा करायला गेले असताना, आदित्य ठाकरे मध्येच उठून गेलेला. कुठल्या नशेत होता? तुझ्या मालकाच्या मुलाला किती शुद्ध आहे? कोणकोणत्या ड्रग माफिया सोबत पार्टी करतो ते सांगावं लागेल” अशी टीका नितेश राणे यांनी केली.
“ड्रग मुक्त महाराष्ट्राची सुरुवात मातोश्री पासून करा. दुसऱ्यांना नौटंकी बोलण्याअगोदर राऊतच आयुष्य तमासगीरासारखं आहे. ते तरी प्रामाणिक असतात” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “बीएमसीचे टेंडर कोणाला दयायचे ते सांगावं लागेल, तुझ्या मालकाचा मुलगा पळून जाईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा वर येऊन रहायचा. दुसऱ्यांना बोलण्यापूर्वी तुम्ही काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा” असं नितेश राणे म्हणाले. “उपमुख्यमंत्र्यांनी तोंड उघडले तर तुझ्या मालकाच कुटुंब आर्थर रोड जेलमध्ये असेल. कोणीही नाराज नाही. मुख्यमंत्री साहेबांना प्रत्येक आमदाराला मार्गदर्शन करण्याचे अधिकार आहेत” असं नितेश राणे म्हणाले.
‘मनोज जरांगेंची चिंता काल होती, आज आहे आणि उद्या ही राहील’
“मनोज जरांगे पाटील हे माझे समाज बांधव आहेत. त्याची चिंता काल होती आज आहे उद्या ही राहील. जरांगेना धोका आहे, असे जी टवाळकी बोलत आहेत. त्यांचा काही हात असेल का ? म्हणून मी त्यांना संरक्षण देण्याची मागणी केली. मनोज जरांगे पाटील यांना नवीन वर्षात गोड बातमी देऊ. घरफोडी, जाळपोळ करणारे मराठे नाहीत. हल्ले करणारे बिगर मराठा आहेत. हिशोब चूकता करण्यासाठी ते करत आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मराठा आरक्षण आपल्याला भेटणार आहे. संयम ठेवला तर कोणालाही आंदोलन करण्याची गरज नाही” असं नितेश राणे म्हणाले.