ठाकरे गटाच्या ‘आक्रोशा’ला शिंदे गटाचे काळे झेंडे, मुंबईत दोन्ही गट आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी

| Updated on: Jun 26, 2023 | 1:52 PM

आम्हाला पायला पाणी नाही. त्यामुळे लांबून पाणी आणावे लागत आहे. आमची पायपीट होत आहे. घरात वीज नाही. त्यामुळे अंधारात राहावे लागत आहे. त्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरून आक्रोश करत आहोत, असं या मोर्चात आलेल्या महिला म्हणाल्या.

ठाकरे गटाच्या आक्रोशाला शिंदे गटाचे काळे झेंडे, मुंबईत दोन्ही गट आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी
aakrosh morcha
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी एकीकडे भाजपने जोर बैठका सुरू केल्या आहेत. कार्यकर्त्यांना कामाला लावले गेले आहे. कोणत्याही परिस्थिती महापालिकेतून ठाकरे गटाला दूर ठेवायचेच असा चंगच भाजपने बांधला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. असं असतानाच ठाकरे गटानेही महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाने थेट नागरी समस्यांना हातच घातला असून महापालिकेवर आज प्रचंड मोठा मोर्चा काढला. यावेळी शिंदे गटाने ठाकरे गटाच्या मोर्चाला काळे झेंडे दाखवले. दोन्ही गट आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. सांताक्रुझच्या एच पूर्व विभागावर हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दुषित पाणी पुरवठा, अपुरी नालेसफाई आणि पायाभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यावरूनहा मोर्चा काढण्यात आला होता. महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा जाहीर निषेध करण्यासाठी काढलेल्या या आक्रोश मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. डोक्यावर हंडा घेऊन महिला मोर्चात आल्या होत्या. काही महिलांनी हातात थाळ्या घेतल्या होत्या. यावेळी महिलांनी थाळी नाद करत पलिकेचा आणि सरकारचा कठोर शब्दा निषेध नोंदवला. यावेळी शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, यावेळी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. नागरी समस्या सोडवल्या नाही तर आणखी मोठा मोर्चा काढू, असा इशाराच अनिल परब यांनी दिला. तसेच राज्य सरकार आणि महापालिका अधिकाऱ्यांवरही त्यांनी सडकून टीका केली. मोर्चानंतर त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

काळे झेंडे

ठाकरे गटाचा हा आक्रोश मोर्चा सुरू असतानाच ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आला. शिंदे गटाने या मोर्चाला काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे घेऊन शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्ते ठाकरे गटाच्या मोर्चा समोर आले होते. दोन्ही गटांकडून एकमेकांच्याविरोधात घोषणाबाजी दिली जात होती. त्यामुळे तणावाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ठाकरे गट 35 वर्ष महापालिकेत सत्तेवर आहे. त्यांना प्रश्न का सोडवता आले नाही? आमची घरे तोडण्यात आली तेव्हा कुठे होता ठाकरे गट? तुमचीच सत्ता होती ना? असा सवाल शिंदे गटाच्या मोर्चेकऱ्यांनी केला.

रुग्णवाहिकेचं लोकार्पण

दरम्यान, विभाग क्रमांक 10 च्या वतीने विभागात नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका देण्यात आली आहे. या विभागातील उपविभाग प्रमुख माजी महापौर श्रद्धा जाधव आणि ठाकरे गटाचे महिला पुरुष शिवसैनिक उपस्थित होते.उद्धव ठाकरे येताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत उद्धव ठाकरे यांच स्वागत केलं. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं आहे.