“फडणवीस यांच्यासाठी ताकद दाखवताय, तेच तुम्हाला संपवायला बसलेत ; ठाकरे गटाने बाजूला केलेल्या नेत्यांची नावं सांगितली

ज्या देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे या नेत्यांना राजकारणातून बाजूला केले. त्याच प्रमाणे ते तुमचाही पत्ता कट करतील अशा शब्दात त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर तोफ डागली.

फडणवीस यांच्यासाठी ताकद दाखवताय, तेच तुम्हाला संपवायला बसलेत ; ठाकरे गटाने बाजूला केलेल्या नेत्यांची नावं सांगितली
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 11:59 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी फडतूस हा शब्द वापरला होता. त्यामुळे आता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचे युद्ध रंगले आहे. फडतूस गृहमंत्री म्हणत त्यांच्यावर टीका करताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना घरकोंबडा म्हणूनही हिणवले आहे. तर टीका करताना विचार करून टीका करा अन्यथा महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला होता.

उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करताच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जास्त टीका करू नये.

कारण त्यांनी आधी आगामी काळातील निवडणुकीसाठी आपले तिकीट मिळवून ठेवावे नंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ज्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे ताकद दाखवताय तेच देवेंद्र फडणवीस तुम्हाला संपवण्यासाठी बसले आहेत अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

ज्या देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे या नेत्यांना राजकारणातून बाजूला केले. त्याच प्रमाणे ते तुमचाही पत्ता कट करतील अशा शब्दात त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर तोफ डागली.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी आशिष शेलार यांचे तिकीट फडणवीस यांनी कसं कापले, त्याच बरोबर चंद्रकांत पाटील यांना राज्याच्या राजकारणातून कसं बाजूला केलं गेलं अशा शब्दात त्यांनी भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.