मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेआधी मोठी बातमी, ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री आठ वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यांच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार? याबाबतची उत्सुकता दाटलेली असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेआधी मोठी बातमी, ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 7:22 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद बोलावल्याची महत्त्वाची बातमी समोर आलीय. या पत्रकार परिषतदेत मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे. असं असताना आता या पत्रकार परिषदेआधीची शिवसेनेतील आतली बातमी समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेकडून ठाकरे गटाला मोठा झटका देण्यात येण्याची शक्यता आहे. कारण आज ठाकरे गटाचा मुंबईतील एक बडा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये ठाकरे गटाला आज पुन्हा धक्का दिला जाणार आहे. मुंबईतील एक ठाकरे गटाचा माजी नगरसेवक शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रवेश मानला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी देखील माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री काय बोलणार?

राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे अनेक घडामोडी या पडद्यामागेही घडत आहेत. तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन भाजप आणि शिवसेनेत मतभेद असल्याचीदेखील चर्चा आहे. खासदार गजनान कीर्तीकर यांनी तर जाहीरपणे याबाबतची नाराजी व्यक्त केलेली. त्यानंतर आज भाजपने शिवसेनेचे खासदार ज्या मतदारसंघात निवडून आले तिथे संयोजक नेमल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या घडामोडींवर एकनाथ शिंदे काही भाष्य करतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. अनेकांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदार-खासदारांवर टीका केली आहे. शिंदे सरकार पूर्ण कार्यकाळ संपेपर्यंत टिकणार नाही, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. या दरम्यान, अनेकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. या सर्वांच्या टीकेला आज रात्री आठ वाजेच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेनुसार राज्य सरकार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर वर्षाला 6 हजार रुपये देणार आहे. पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा मिळण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे. याशिवाय इतर महत्त्वाचे देखील निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांबद्दलही मुख्यमंत्री आजच्या पत्रकार परिषदेत माहिती देण्याची शक्यता आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.