“आमच्या हिंदुत्वाचं सर्टिफिकेट ‘या’ टोळ्यांना आम्ही का दाखवू”; ठाकरे गटाने शिंदे गटाला टोळी म्हणून हिणवलं…

उद्धव ठाकरे हे सातत्याने हिंदुत्वाच्या भूमिकेवर कायम असल्यामुळे आम्ही यांना आमचे हिंदुत्वाचे सर्टिफिकेट त्यांना आम्ही का देऊ असा प्रतिसवाल ठाकर गटाने शिवसेना आणि भाजपला केला आहे.

आमच्या हिंदुत्वाचं सर्टिफिकेट 'या' टोळ्यांना आम्ही का दाखवू; ठाकरे गटाने शिंदे गटाला टोळी म्हणून हिणवलं...
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 4:10 PM

मुंबई : राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी गाजत असतानाच काल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर राज्यातील राजकारण आणखी ढवळून निघाले.भाजप एकीकडे हिंदुत्वाच्या मुद्यावरून ठाकरे गटाला लक्ष्य करत असतानाच आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्या औरंगजेबच्या समाधीला भेट देण्यावरून आता नवा वाद उखरून काढण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाच्या युतीविषयी जोरदार चर्चा चालू होती. त्यावरूनच आता भाजपने ठाकरे गटावर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर आता ठाकरे गटाची भूमिका काय असणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्याच बरोबर आता ठाकरे गटाच्या हिंदुत्वाला हे पटणार आहे का असा सवालही त्यांनी केला होता.

त्यावरूनच आता वाद पेटला असून ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपला आणि शिंदे गटालाही त्यांनी सुनावले आहे.

आता नवीन पदाधिकारी

खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेवर आणि भाजपवर टीका करताना हिंदुत्वाच्या मुद्यावरूनच त्यांनी शिंदे गटाला छेडले आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्ता शिबिरामध्ये बोलताना आपल्या पक्षाची शिबिरं चांगल्या पद्धतीने होत असून कोणीही पक्ष सोडून गेलं तरी आम्हाला आता नवीन पदाधिकारी मिळत असल्याचे त्यांनी विश्वासाने सांगितले आहे. यावेळी त्यांनी मनीषा कायंदे या पक्ष सोडून का गेल्या यावर बोलताना सांगितले की, त्या का आणि कशामुळे गेल्या आहेत हे अद्याप माहित नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हिंदुत्वाचे सर्टिफिकेट

यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या औरंगजेबच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेना आणि भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा पुढं करुन ठाकरे गटावल हल्लाबोल केला होता. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, आमचे हिंदुत्वाचे सर्टिफिकेट यांना देण्याची गरज आम्हाला वाटत नाही. कारण आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने हिंदुत्वाच्या भूमिकेवर कायम असल्यामुळे आम्ही यांना आमचे हिंदुत्वाचे सर्टिफिकेट त्यांना आम्ही का देऊ असा प्रतिसवालही खासदार चतुर्वेदी यांनी केला आहे.

भाजप आणि शिवसेनेला डिवचले

यावेळी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेला शिंदे गटाची टोळी म्हणूनही त्यांना त्यांनी हिणवले आहे. शिंदे आणि त्यांची टोळी आणि फडणवीस आणि त्यांच्या टोळीला तुम्ही विरोधक म्हणत असाल तर आमच्या हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आम्ही या टोळ्यांना का दाखवू असा सवाल करुन त्यांनी भाजप आणि शिवसेनेला डिवचले आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.