शिंदे यांचे क्लिंटन, तर ठाकरे यांचे बायडेन: नेमकं राजकारण काय..?
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सगळे नेते एकत्र आले असले तरी नहले पे दहला या उक्तीनं नेत्यांमध्ये टोलेबाजी आता रंगली आहे.
मुंबईः अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांनी एका व्यक्तीला आपल्याबद्दल विचारणा केल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली होती. त्या दाव्यावर संजय राऊत यांनी उपरोधिक टीका केली आहे. त्याशिवाय मागच्या अजित पवार आणि फडणवीस यांच्यातही टीकेच्या परतफेडीचा सामना रंगला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सगळे नेते एकत्र आले असले तरी नहले पे दहला या उक्तीनं नेत्यांमध्ये टोलेबाजी आता रंगली आहे.
अमेरिकेच्या बिल क्लिंटन यांनी आपल्या कामाची दखल घेत विचारपूस केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटल्यानंतर बायडन आणि रशियाचे पुतीनसुद्धा उद्धव ठाकरे कोण आहेत म्हणून विचारणा करत असल्याचं राऊत यांनी उपरोधिकपणे टोला हाणला
तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता अजित पवार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचाच विडा उचलला आहे. 2024 मध्ये बारामतीत अजित पवार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं आव्हान बावनकुळे यांनी स्वीकारलं आहे.
बावनकुळेंच्या या आव्हानानं झोप उडाली असून आता राजकीय संन्यासाशिवाय पर्याय नसल्याचं अजित पवार यांनी म्हटले आहे. तर तिकडे काल अजित पवार यांनी महिला मंत्र्यांवरुन फडणवीसांना टोले मारले. त्या सर्व टोल्यांची परतफेड आज देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
तर अजित पवार यांनी मंत्रिमंडळामध्ये अजून महिला मंत्री नसल्याचे विचारत गेल्या सहा महिन्यामध्ये एकही महिला मंत्री का मिळाली नाही असा टोला लगावला. मी आता तर अमृतवहिणींनाच येऊन सांगणार मग लगेच महिला मंत्री मिळेल असा टोला त्यांना हाणला.