‘रवींद्र वायकर यांना ईडीच्या धमक्या’, संजय राऊत यांचा मोठा आरोप

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईडीवर खूप मोठा आरोप केला आहे. ईडीकडून रवींद्र वायकर यांना पक्षप्रवेशासाठी धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केल्या आहेत. वायकर यांनी पक्षप्रवेश केला नाही तर त्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात येत असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

'रवींद्र वायकर यांना ईडीच्या धमक्या', संजय राऊत यांचा मोठा आरोप
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 5:27 PM

दिनेश दुखंडे, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईडीवर मोठा आरोप केला आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायक यांना ईडीच्या धमक्या दिल्या जात असल्याचा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विटरवर याबाबतचा खळबळजनक दावा केला आहे. रवींद्र वायकर यांच्या पाठीमागे सध्या ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्यावर जोगेश्वरीतील जमिनीच्या भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई सुरु आहे. ईडीने त्यांची आधी चौकशी देखील केली आहे. पण आता संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

“शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे. येत्या काही दिवसात शिवसेना सोडा. पक्षांतर करा. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे. हा एक प्रकारे दहशतवाद आहे. असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते. रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत. ते लढतील आणि जिंकतील. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा

महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये नेहमी केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीवरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडतात. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांच्या पाठीमागे तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे.  नुकतंच काही दिवसांपूर्वी रवींद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी झाली होती. तसेच ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचीदेखील कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी चौकशी झाली होती. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना कथित खिडची घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.