मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ, खंडणीप्रकरणी लूकआऊट नोटीस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झालीय. परमबीर सिंह यांच्याविरोधात आता दुसरा खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी सिंह यांना लूकआऊट नोटीस बजावलीय.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ, खंडणीप्रकरणी लूकआऊट नोटीस
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सोमवारी हजर राहण्याचे चांदिवाल आयोगाचे आदेश
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 11:08 AM

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झालीय. परमबीर सिंह यांच्याविरोधात आता दुसरा खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी सिंह यांना लूकआऊट नोटीस बजावलीय. याबाबत ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी माहिती दिली. परमबीर सिंह यांच्या विरोधात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात एक खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी ही नोटीस देण्यात आलीय.

मुंबई आणि ठाणे शहराचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्याविरुद्ध आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सिंग यांनी शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी परमवीर सिंग यांच्याविरुद्ध कलम 384, 385, 388, 389, 420, 364 ए, 34 ,120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग व्यतिरिक्त संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि मनेरे यांचीही नावे आहेत. परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना मनारे हे त्यावेळी ठाण्याचे गुन्हे शाखेचे डीसीपी होते.

खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा

याआधी, परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण (DCP Akbar Pathan) यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कालच गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे. त्यानंतर परमबीर सिंग यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे.

परमबीर सिंग आणि अनिल देशमुख प्रकरण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.

हेही वाचा :

चांदिवाल आयोगाच्या स्वतंत्र चौकशीची गरजच काय? परमबीर सिंह यांची हायकोर्टात याचिका

केतन तन्ना-सोनू जालानची खंडणी प्रकरणात तक्रार, परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर गुन्हा

मुंबई-ठाण्यात खंडणीचा गुन्हा, परमबीर सिंह यांच्या पाच निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली

व्हिडीओ पाहा :

Thane police issued look out notice to Param Bir Singh in extortion case

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.