आदित्य ठाकरे यांच्या ‘इलाका भी हमारा धमाका भी हमारा’ ला उत्तर…वरळीत येऊन पाडू

Shivsena | ठाण्यामध्ये नका भाषण झाडू, युवा सेनेने ठरवले तर वरळीत येऊन पाडू, असा सरळ इशारा दिला आहे. ठाणे शहरात या बॅनरजी जोरदार चर्चा रंगली आहे. युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळाव्याच्या बॅनरमधून आदित्य ठाकरे यांना ईशारा दिला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या 'इलाका भी हमारा धमाका भी हमारा' ला उत्तर...वरळीत येऊन पाडू
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 11:46 AM

गणेश थोरात, मुंबई, दि. 23 फेब्रुवारी 2024 | शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर दोन्ही गटात वाद सुरु झाला संपण्याची चिन्ह नाही. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. आता आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात केलेल्या भाषणाला जोरदार उत्तर युवासेनेकडून देण्यात आले आहे. त्यासाठी बॅनरबाजीचा आधार घेतला आहे. त्यात ठाण्यामध्ये नका भाषण झाडू, युवा सेनेने ठरवले तर वरळीत येऊन पाडू, असा सरळ इशारा दिला आहे. ठाणे शहरात या बॅनरजी जोरदार चर्चा रंगली आहे.

काय आहे प्रकरण

‘इलाका भी हमारा धमाका भी हमारा’, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात येऊन केले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी बॅनरच्या माध्यमातून युवा सेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “ठाण्यामध्ये नका भाषण झाडू, युवा सेनेने ठरवले तर वरळीत येऊन पाडू” अशा प्रकारचा मजकूर लिहिला आहे. या बॅनरबाजीतून आदित्य ठाकरे यांना  प्रतिउत्तर देण्यात आले आहे.

राज्यस्तरीय मेळाव्याच्या निमित्ताने बॅनर

ठाण्यातील कॅडबरी जंक्शन या ठिकाणी रेमंड मैदान या ठिकाणी युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा 24 फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे. ठाण्यात  शिवसेना शिंदे  गटाच्या युवा सेनेची बॅनरबाजी जागो जागी दिसत आहे. या मेळाव्यात 36 जिल्हयातून युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगामी लोकसभा निवडणूक पाहता युवा सेनेला काय कान मंत्र देतात हे पाहणे गरजेचे राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे यांनी १८ फेब्रुवारी रोजी ठाणे दौरा केला होता. त्यात हे चिंदी चोरांचे सरकार असल्याचा आरोप केला होता. ठाण्यात महिला सुरक्षित आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या ठाण्यातून सांगतोय की इलाका भी हमारा आणि धमाका भी हमारा. ठाण्यात येऊन सांगतो आता बदल घडवणार म्हणजे घडवणार,असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.