तुझ्या सेल्फीच्या चरबीमुळे डील फसली, सुनील पाटील केपी गोसावीवर भडकला; विजय पगारेंचा दावा
केपी गोसावीला 50 लाख मिळाले होते. डील शंभर टक्के झाली होती. पैसे हवाला झाले होते. हवाला झालेले पैसे परत गेले असंही सुनील म्हणाला होता. पण 50 लाख अॅडव्हान्स मिळाले होते. साडे सतरा कोटी हवाला झाले होते. पण ते परत गेले. हे वाक्य सुनील पाटील मला बोलला.
मुंबई : आर्यन खान प्रकरणी पूजा ददलानी, के पी गोसावी, सॅम डिसुझा, मनिष भानुशाली आणि सुनील पाटील यांच्यात डिल झाली. मात्र आर्यन खानसोबत के पी गोसावीने काढलेल्या सेल्फीमुळे सर्व गेम फसला. यामुळे डिलचा मास्टरमाइंड सुनील पाटील केपी गोसावीवर भडकला. तुझ्या सेल्फीमुळे आणि तुझ्या चरबीमुळे संपूर्ण डील फेल झाली. तुला सेल्फीची चरबी चढली होती. तुझ्या सेल्फीमुळे आपले 18 कोटी गेले. माझे काय हाल झालेत, मी काय भिकारी झालो. माझ्या समोर देणेकरी बसलेत. मला पैसे द्यायचे आहेत. तुझ्यामुळे सेल्फीमुळे संपूर्ण डिल कॅन्सल झाली, असं सुनील पाटील हे केपी गोसावीला बोलत होते, असा विजय पगारेंनी खुलासा केला आहे.
केपी गोसावीला 50 लाख मिळाले होते. डील शंभर टक्के झाली होती. पैसे हवाला झाले होते. हवाला झालेले पैसे परत गेले असंही सुनील म्हणाला होता. पण 50 लाख अॅडव्हान्स मिळाले होते. साडे सतरा कोटी हवाला झाले होते. पण ते परत गेले. हे वाक्य सुनील पाटील मला बोलला. सॅम डिसुझाचा पैशासाठी सुनील पाटीलला फोन येत होता. मेहूलही त्यांच्याशी बोलत होता. त्यांचं संभाषण व्हाईस कॉलवरूनच सुरू होतं. ते साध्या कॉलवरून कधी बोलले नाही, असे पगारे म्हणाले.
सॅम डिसुझा, मेहूल पैसे रिर्टनसाठी पाटीलवर प्रेशर टाकत होते
सुनील पाटीलने 5 तारखेला मला तो विषय सांगितला. ते केपी गोसावीबरोबर बोलत होते. केपी पैसे परत कर म्हणून सांगत होते. केपी म्हणाले, माझ्याकडून काही पैसे खर्च झाले. 38 लाख पाठवून दिले. चार पाच लाखाची व्यवस्था करतोय, ते पाठवून देतो असं केपी गोसावी म्हणाले. सुनील संतापून बोलत होते. तुझ्यामुळे सेल्फीमुळे संपूर्ण डिल कॅन्सल झाली. सॅम डिसुझा आणि मेहूल पैसे रिर्टनसाठी सुनील पाटीलवर प्रेशर टाकत होते. त्यावेळी मी त्यांच्यासमोरच बसलेलो होतो. हे संभाषण सुरू असताना सुनील पाटील अधूनमधून रडलाही होता. पूजा मॅडम, सॅम डिसुझा आणि मेहूल यांच्यामुळे ही गडबड झाल्याचं ते बोलत होते.
पाटील सोबत असल्याने भानुशाली आणि गोसावीशी ओळख
सुनील पाटील आणि मी एकाच गावचा आहे. पाटील सोबत असल्याने भानुशाली आणि गोसावीशी ओळख झाली. कारण त्यांचं सुनील पाटीलकडे येणं जाणं होतं. केपी गोसावी हा भारताचा गुप्तहेर असल्याचं मला सुनील पाटील यांनी सांगितलं होतं. अहमदाबादला इलूगया होटेलला त्यांनी माझी केपी गोसावी गुप्तहेर असल्याची ओळख करून दिली. गोसावी काहीही करू शकत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मी गोसावीला त्या दिवसापासून मान सन्मान देत होतो.
गेल्या पाच सहा महिन्यापासून मी सुनील पाटील सोबत आहे. कारण मी 2018-19मध्ये मी सुनील पाटीलला काही रक्कम दिली होती. पण लॉकडाऊनमुळे मला ती मिळाली नाही. त्यानंतर मी गेल्या पाच महिन्यापासून त्यांच्या मागे तगदा लावला आणि त्यांच्यासोबतच होतो. पाटील हा कधी मुंबई, गुजरात तर कधी द ललित हॉटेलला राहायचा. मी सुनील पाटीलला 18 लाख नाही तर 35 लाख दिले आहेत. 20 लाख माझे आहेत आणि 15 लाख माझ्या मित्राचे आहेत. ठाण्याचे जितू सर म्हणून आहेत. आम्ही दोघांनी मिळून दिले. रेल्वेत कपडे पुरवणे, यूनिफॉर्म देणे आदी काम तो आम्हाला मिळवून देणार होता. 7 मार्च रोजी तो आम्हाला या कामासाठी दिल्लीलाही घेऊन गेला होता. रेल्वे बोर्डात विनयकुमार यादव यांना भेटायला गेलो होतो. आम्ही दिल्लीत रेल्वे कार्यालयात गेलो. त्यावेळी आम्ही खाली होतो. तो एकटाच वर गेला होता. (The deal failed because of the fat of your selfie, Sunil Patil lashed out at KP Gosavi; Vijay Pagare claims)
इतर बातम्या
सेल्फीमुळे गेम फसला, कुणा कुणात झाली होती डील?; विजय पगारेंनी सांगितली आँखो देखी
आर्यन खान डील प्रकरणाशी समीर वानखेडेंचा संबंध आहे का?; विजय पगारे यांनी केला मोठा खुलासा