Uddhav Thackeray : ‘जो अनुभव भाजपच्या युतीत घेतला, त्याची पुनरावृत्ती नको’; उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मित्रांना काय दिला सल्ला

Uddhav Thackeray Big Statement: मुंबईतील महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग केली. त्यांनी महायुतीवर प्रहार केला. लोकसभा निवडणुकीत प्रचार करायला कमी वेळ मिळाला, पण आता मैदानात उतरण्याचे त्यांनी संकेत दिले.

Uddhav Thackeray : 'जो अनुभव भाजपच्या युतीत घेतला, त्याची पुनरावृत्ती नको'; उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मित्रांना काय दिला सल्ला
उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीला सल्ला
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 12:06 PM

मुंबईतील महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर आणि केंद्रावर जोरदार प्रहार केला. त्यांनी राजकारणातील विविध विषयाला हात घातला. लोकसभा निवडणुकीत प्रचार करायला वेळ कमी मिळाला असला तरी विधानसभेसाठी दारुगोळा जमा केल्याचे त्यांनी संकेत दिले. त्याचवेळी ‘जो अनुभव भाजपच्या युतीत घेतला, त्याची पुनरावृत्ती नको’; अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मित्रांना असा सल्ला दिला.

आता लढाई महाराष्ट्र धर्म वाचवण्याची

आता महाराष्ट्र धर्म वाचवण्याची, महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवण्याची लढाई आहे. तू राहील नाही तर मी राहील या जिद्दीने निवडणूक लढायला पाहिजे. पण हे आपल्यात व्हायला नको. त्यांच्याविरोधात आपल्याला लढायचं आहे, जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत. आपली आघाडी आधीपासूनच आहे. सरकारला आता जाग आली आहे. काही केलं पाहिजे असं त्यांना वाटतं. डुबक्या मारून बघत आहेत, पवित्र होता येईल का. रक्षाबंधनात स्वत:चे फोटो छापत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

तुम्ही चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा

पुढच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आम्ही आहोतच. मी पण महाराष्ट्राचं हित जपू,. उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल. पण यांना झोपवू याची शपथ घ्या. आपल्यात काड्या घालणारे लोक आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होणार. आता शरद पवार आणि पृथ्वीराजजी तुम्ही जाहीर करा. मी पाठिंबा देईल. मी माझ्यासाठी लढत नाही. मी मुख्यमंत्रीपद सोडलं ते महाराष्ट्रासाठी, असे ते म्हणाले.

आता पुन्हा तो अनुभव नको

महाराष्ट्र झुकवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. जो महाराष्ट्राला झुकवण्याचं काम करतो त्याला गाडून टाकतो. आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा. मी पाठिंबा देतो. जो अनुभव भाजपच्या युतीत घेतला. त्याची पुनरावृत्ती नको. २० आणि २५ वर्ष आमची युती होती. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण होतं. त्यावेळी एकमेकांच्या पायावर धोंडे पाडल्या जायचे. पाडापाडीचं राजकारण व्हायचं. त्यात महायुतीला काही नाही. त्यामुळे आधी ठरवा. चला पुढे. मला काही हरकत नाही. पण या धोरणाने जाऊ नका, असा सल्ला त्यांनी महाविकास आघाडीतील मित्रांना दिला.

Non Stop LIVE Update
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?.
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'.
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.