हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; नेरुळ स्टेशन जवळ रेल्वे रुळाला तडे
हार्बर रेल्वे मार्गावर सीवूड्स नेरुळ(Nerul ) दरम्यान रेल्वे रुळाला तडे( crack in the track) गेले आहेत. यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक खंडित झाली असल्याची अनाऊंन्समेंट सर्व रेल्वे स्थानकांवर करण्यात येत आहे.
मुंबई : हार्बर रेल्वेची(harbor railway) वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर सीवूड्स नेरुळ(Nerul ) दरम्यान रेल्वे रुळाला तडे( crack in the track) गेले आहेत. यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक खंडित झाली असल्याची अनाऊंन्समेंट सर्व रेल्वे स्थानकांवर करण्यात येत आहे. ऐन गर्दीच्या वेळेत रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. रेल्वे सेवे ठप्प झाल्याने घरी जाणारे हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडले आहे. रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ट्रॅक दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.