BJP: मुंबईचा महापौर आमचाच होणार, मुंबई भाजपा अध्‍यक्ष आशिष शेलार यांचा दावा, नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवणार

मुंबईकरांसाठी आम्‍ही गेली दोन दशकभर ज्‍यांच्‍याबरोबर संघर्ष केला, त्‍या भ्रष्‍टाचारी व्‍यवस्‍थेला तडीपार करण्‍यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्ठा करेन. तसेच केंद्रीय नेतृत्वाला मुंबईत जे काम अपेक्षित आहे ते करत यश संपादन करुन देण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही करू. असेही शेलार म्हणाले.

BJP: मुंबईचा महापौर आमचाच होणार, मुंबई भाजपा अध्‍यक्ष आशिष शेलार यांचा दावा, नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवणार
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 8:06 PM

मुंबई- आमचं ठरलं, मुंबईकरांना जो बदल अपेक्षित आहे, तो बदल मुंबईत होणार. मुंबईचा महापौर “आमचाच” होणार, (Mumbai Mayor)असा विश्वास भाजपा नेते, आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्‍यांची पुन्‍हा मुंबई अध्‍यक्षपदी (Mumbai BJP President)नियुक्ती झाल्‍यानंतर व्यक्त केला. मुंबई महापालिका निवडणुक तोंडावर असताना भाजपाने मुंबई अध्‍यक्षपदात मोठा बदल केला असून यापुर्वी दोन टर्म अध्‍यक्ष असलेल्‍या आमदार शेलार यांच्‍या गळयात अध्‍यक्षपदाची माळ घातली आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून ही नियुक्‍ती जाहीर झाल्‍यानंतर शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे आभार मानत याबाबत आपली सविस्‍तर भूमिका मांडली. पक्षाने माझ्यावर जो विश्‍वास दाखविला त्‍याला तडा जाणार नाही, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी यावेळी दिली.

मुंबईत नक्की यश मिळवू – शेलार

मुंबईकरांसाठी आम्‍ही गेली दोन दशकभर ज्‍यांच्‍याबरोबर संघर्ष केला, त्‍या भ्रष्‍टाचारी व्‍यवस्‍थेला तडीपार करण्‍यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्ठा करेन. तसेच केंद्रीय नेतृत्वाला मुंबईत जे काम अपेक्षित आहे ते करत यश संपादन करुन देण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही करू. त्‍यासाठी मुंबईतील भाजपाचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिका-यांची मोठी टीम असून सगळे मिळून आम्‍ही आमचाच महापौर महाापालिकेत बसवू असेही आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केले.

हे सुद्धा वाचा

ठराविक कंत्राटदारांना तडीपार करा – शेलार

मुंबईतील रखडलेला कोस्‍टल रोड, मेट्रोच्‍या आरेतील कारशेडला अडवणे, रस्त्यावर पडलेले खड्डे, संगणक खरेदीमध्‍ये भ्रष्‍टाचार, शालेय साहित्‍य देण्यात झालेला विलंब अशी अत्‍यंत भ्रष्‍ट व्‍यवस्‍था मुंबई महापालिकेत असून मुंबईकरांना या पासून सुटका हवी आहे. ज्‍यांनी आतापर्यंत ठराविक कंत्राटदरांना पोसले व कंत्राटदारांनी ज्यांना पोसले त्यांना महापालिकेतून तडीपार करण्याची गरज आहे. मुंबईकरांची ही इच्छा पुर्ण होईल, असेही त्यांनी जाहीर केले

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.