Rajya sabha election:जनता अडचणींचा सामना करतेय आणि सत्ताधाऱ्यांचा पंचातारांकित निवडणुकांचा खेळ, मनसेचे जोरदार टीकास्त्र, एमआयएमची मदत कशासाठी?
निजामाची अवलाद असलेल्या एमआयएमची निवडणुकीत मदत घेऊन, महाविकास आघाडीने जनाची नाही पण मनाचीही सोडली आहे, अशी टीका मनसेने केली आहे.
मुंबई– राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु असलेल्या राज्यसभा निवडणूक (Rajya sabha election)नाट्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सडकून टीका केली आहे. एकीकीडे राज्यातील जनता अडचणींचा सामना करीत असताना, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित खेळ सुरु आहे, अशी टीका मनसेचे (MNS)प्रवक्ते गजानन काळे यांनी केली आहे. याबाबतचे ट्विट करत त्यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे. राज्यसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपाने (Shivsena BJP) प्रतिष्ठेची केली आहे. सहाव्या उमेदवारावरुन जोरदार डावपेच होत आहेत. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत, त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो आहे, दुसरीकडे राज्यातील समस्या मात्र तशाच असल्याची टीका मनसेकडून करण्यात आली आहे. एमआयएमच्या घेतलेल्या पाठिंब्याबाबतही टीका करण्यात आली आहे.
“राज्याची शोभा” होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे.
हे सुद्धा वाचाजनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे. त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली,ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे.
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 10, 2022
महाविकास आघाडीने जनाची नव्हे पण मनाचीही सोडली -मनसे
निजामाची अवलाद असलेल्या एमआयएमची निवडणुकीत मदत घेऊन, महाविकास आघाडीने जनाची नाही पण मनाचीही सोडली आहे, अशी टीका मनसेने केली आहे. एमआयएमच्या दोन आमदारांनी आज सकाळी मविआला पाठिंबा देत, त्यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यानिमित्नतानं शिवसेनेचं नकली,ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे. अशी टीकाही मनसेने केली आहे. राज्याची शोभा करणारी ही निवडणूक असल्याची टीका त्यांनी केली आहे.
कोट्यवधींचा चुराडा आणि मविआत बिघाडी
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार हे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांमध्ये ठेवण्यात आले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये आणि आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या निवडणुकीत हॉटेल मालकांचे पितळ मात्र चांगलेच पिवळे झाले आहे. या निमित्ताने कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आल्याची टीका करण्यात येते आहे. मात्र इतके करुनही शेवटच्या काही काळात महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मतांचा कोटा ४४ केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापल्याची माहिती आहे. यामुळे शिवसेनेचा उमेदवार अडचणीत आल्याचे मानण्यात येते आहे. त्यामुळे यानिमित्ताने महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे सांगण्यात येते आहे.