Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपमध्ये घराणेशाही नसेल, पण पक्ष व्यक्तिकेंद्रित झालाय; मोदी-शाह सोडून कोणाचे ऐकले जाते का?’

Shivsena BJP | मोदी-शहा यांच्याव्यतिरिक्त आज भाजपमध्ये अन्य कुणाचे बोलणे ऐकले जाते काय? राष्ट्रीय कार्यकारिणी वगैरे हा सर्व मुखवटा आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय भाजपकडे निवडणूक जिंकून देणारा चेहराच नाही.

'भाजपमध्ये घराणेशाही नसेल, पण पक्ष व्यक्तिकेंद्रित झालाय; मोदी-शाह सोडून कोणाचे ऐकले जाते का?'
अमित शाह आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 8:35 AM

मुंबई: काँग्रेस पक्षावर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून चांगलेच पेचात पकडण्यात आले आहे. हा पक्ष एखाद्या कुटुंबाच्या हातात नाही असे श्री. मोदी यांनी सांगितले. कुटुंबकेंद्रित असणे व व्यक्तिकेंद्रित असणे यात फार फरक नाही. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत, अशी बोचरी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

मोदी-शहा यांच्याव्यतिरिक्त आज भाजपमध्ये अन्य कुणाचे बोलणे ऐकले जाते काय? राष्ट्रीय कार्यकारिणी वगैरे हा सर्व मुखवटा आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय भाजपकडे निवडणूक जिंकून देणारा चेहराच नाही. त्यामुळे इतर मोहोऱ्यांनी उगीच फडफड करू नये. सात वर्षांत जनतेचा विश्वास खरोखरच जिंकला असता तर फक्त ‘मोदी मोदी’ करण्याची वेळ पक्षावर आली नसती, असे टीकास्त्र ‘सामना’तून सोडण्यात आले.

‘पक्षासाठी आयुष्य वेचलेल्या लोकांची मार्गदर्शक मंडळात रवानगी’

भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या जडणघडणीत ज्यांनी हयात घालवली अशा सगळय़ाच ज्येष्ठश्रेष्ठांना आज ‘मार्गदर्शक मंडळा’च्या कोंदणात ‘मानाचे स्थान’ दिले असले तरी हा व्यक्तिकेंद्रित आणि ‘उदो उदो’ राजकीय व्यवस्थेचाच भाग आहे. भारतीय जनता पक्षाची उभारणी व जडणघडण करण्यात आडवाणी यांनी आयुष्य वेचले आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांनी जनतेचा विश्वास सरळ मार्गाने जिंकला होता. कुटुंबाची सत्ता हा वेगळा भाग, पण व्यक्तिकेंद्रित सत्तेचा पट दोन-चार लोकांच्याच हाती असतो व ते त्याचेच कुटुंब असते. त्या कुटुंबापलीकडे सत्तेचा परिघ सरकत नाही. गांधी घराणे आहेच, पण आज कोणती घराणी सत्ता चालवीत आहेत हे काय देशाला माहीत नाही?, असा सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या या टीकेला भाजप कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘जे धोतरात कमावले ते लुगडय़ात गमावले’

एनसीबीच्या सुपारीबाज अधिकाऱ्यांच्या टोळीशी ‘जॉइण्ट व्हेंचर्स’ करून ड्रग्जसंदर्भातले खेटे गुन्हे दाखल करायचे. श्रीमंतांच्या पोरांना याबाबत अडकवायचे व खंडण्या उकळायच्या, असा नवा कारभार भाजपपुरस्पृत लोकांच्या सहकार्याने सुरू झाला आहे. त्यासाठी श्रीमंतांच्या मुलांचे अपहरण करण्यापर्यंत मजल गेली. राजकरणात पैसे कमावण्याचा हा नवा उद्योग सुरू झाला आहे व भाजपचे भागभांडवल या उद्योगात मोठय़ा प्रमाणात गुंतले आहे. हे असे पितळ उघडे पडत असताना एखादा पक्ष जनतेचा विश्वास कसा जिंकेल? जे धोतरात कमावले ते लुगडय़ात गमावले, असा काहीसा प्रकार घडत आहे.

संबंधित बातम्या:

BJP: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुका, आर्टिकल 370 सह ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

Aslam Shaikh: भाजपचे लोक एनसीबीचे प्रवक्ते आहेत का? त्यांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध काय?; अस्लम शेख यांचा सवाल

LK Advani Birthday : ‘हॅप्पी बर्थडे अडवाणीजी’, मोदी, शहा, राजनाथ, जेपी नड्डांकडून शुभेच्छांचा वर्षाव

हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....