Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या अडचणीत भर; त्यांच्या नावाने जात पडताळणीच झालीच नाही; आरटीआयमधून उघड

समीर वानखेडे यांनी ते अनुसूचित जातीतील (एससी) अर्थात मागास प्रवर्गातील असल्याचा दावा केला आहे. मात्र समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणीच झाली नसल्याचे आरटीआय अर्जावर प्रशासनाने दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे. जिल्हा जात पडताळणी समिती मुंबई यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या अडचणीत भर; त्यांच्या नावाने जात पडताळणीच झालीच नाही; आरटीआयमधून उघड
समीर वानखेडे यांची चौकशी
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 9:13 PM

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर ड्रग पार्टी प्रकरणात कारवाई केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत नवीन भर पडली आहे. माहिती अधिकारातून (आरटीआय) उघडकीस आलेली नवी माहिती धक्कादायक आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणीच झाली नसल्याचे आरटीआयमधून समोर आले आहे. त्यामुळे वानखेडे हे जातीचा मुद्द्यावरून ते मोठ्या संकटात सापडू शकतात, अशी शक्यता आता वर्तविली जात आहेत.

समीर वानखेडे यांनी बोगस प्रमाणपत्रे दाखवून सरकारी नोकरी बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या मुद्द्यावरून समीर वानखेडे यांना घेरलेले असतानाच भीम आर्मीनेही या प्रकरणी कारवाईची मागणी करीत तक्रार दाखल केलेली आहे. वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी ते अनुसूचित जातीतील असल्याचे सांगितले होते. आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे दाखवली होते, असा आरोप भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन आर्मीने याआधी केला आहे. या दोन्ही संघटनांनी जिल्हा जात पडताळणी समितीकडे याबाबत तक्रार केली आहे. याचदरम्यान आरटीआयमधून वानखेडेंसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरटीआयमधून नेमका काय खुलासा झाला?

समीर वानखेडे यांनी ते अनुसूचित जातीतील (एससी) अर्थात मागास प्रवर्गातील असल्याचा दावा केला आहे. मात्र समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणीच झाली नसल्याचे आरटीआय अर्जावर प्रशासनाने दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे. जिल्हा जात पडताळणी समिती मुंबई यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीत रुजू होताना समीर वानखेडेंनी नेमके कोणते प्रमाणपत्र दाखल केले? त्यांनी अनुसूचित जातीतील असल्याचे कशाच्या आधारे सिद्ध केले? असे विविध प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी यासंदर्भात अर्ज करून माहिती मागविली होती. त्यांच्या अर्जावर मिळालेल्या उत्तरामुळे वानखेडे यांनी केलेल्या विविध दाव्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच वानखेडे हे दलित आहेत की मुस्लिम? हा वाद अजून सुरू असून या मुद्द्यावरून वानखेडे पुन्हा एकदा कचाट्यात सापडणार आहेत.

सध्या एनसीबीमध्ये मुंबई विभागीय संचालक म्हणून कार्यरत असलेले समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. त्यांचा एनसीबीतील कार्यकाल 31 डिसेंबरला संपणार आहे. त्यांना या कार्यकालमध्ये पुन्हा मुदतवाढ मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यातच जात पडताळणी समितीकडून धक्कादायक माहितीचा उलगडा झाला आहे. (There was no caste verification in the name of Sameer Wankhede, Revealed from RTI)

इतर बातम्या

Sangali Crime: माता न तू वैरिणी! सांगलीत साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याची आईकडून हत्या; वाचा असे काय घडले की पोटच्या गोळ्यालाच संपवले

Pune crime | पुण्यातील कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड’ ची 44 लाखांची फसवणूक

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.