Sanjay Raut : ही लढाई बाळासाहेब निष्ठावंत विरुद्ध शरद पवार निष्ठावंत? संजय राऊतांनी सवालावर खाडकन प्रती सवाल केला

भाजपाकडून हे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे, अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यातून त्यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

Sanjay Raut : ही लढाई बाळासाहेब निष्ठावंत विरुद्ध शरद पवार निष्ठावंत? संजय राऊतांनी सवालावर खाडकन प्रती सवाल केला
संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:41 AM

मुंबई : पवारांचे निष्ठावंत वगैरे काही नसते. सर्व महाराष्ट्राचे निष्ठांवत आहेत. आम्ही महाराष्ट्राचे निष्ठावंत आहोत. आम्ही बाळासाहेबांचे निष्ठांवत आहोत. त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका, की आम्ही कोणाचे निष्ठावंत आहोत, असा प्रतिसवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांकरवी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला विचारला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये असलेले आमदार हे सर्व शिवसेनेचे (Shivsena) निष्ठावंत आहेत. ते बाळासाहेबांचे निष्ठावंत आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेतील काही लोक आता शरद पवार यांचे निष्ठावंत झाले आहेत, अशी नाराजी शिवसैनिकांमध्ये आहे, असा आरोप भाजपातर्फे करण्यात येत होता. त्यासंबंधी विचारले असता संतप्त होत संजय राऊत यांनी खाडकन भाजपालाच (Maharashtra BJP) प्रतिसवाल केला आहे. तसेच राज्य अस्थिर करत असल्याचा आरोपही राऊत यांनी भाजपावर केला.

का संतापले संजय राऊत?

पवार निष्ठावंत हा काय प्रकार आहे? पवारांचे निष्ठावंत वगैरे काही नसते. सर्व महाराष्ट्राचे निष्ठांवत आहेत, प्रत्त्युत्तर त्यांनी भाजपाला दिले. बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचाही तुम्हाला अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज असते, तरी त्यांनी या सरकारला आशीर्वाद दिले असते, असे संजय राऊत म्हणाले. भाजपाकडून हे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे, अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यातून त्यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करणारी शिवसेना आता त्यांच्याचसोबत सरकारमध्ये आहे, हे भाजपाला खटकत असल्याने अशाप्रकारचे आरोप केले जात असल्याचा संजय राऊत यांचा सूर आहे.

हे सुद्धा वाचा

‘महाराष्ट्रात हे चालणार नाही’

एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि नवी दिल्लीमध्ये सुरू असलेली खलबते यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. गुजरातच्या भूमीचा अशाप्रकारे सरकार पाडापाडीसाठी वापर होत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात लोटस ऑपरेशन यशस्वी होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. दुसरीकडे 29 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत तर 35 आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा भाजपातर्फे करण्यात आला आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.