हीच ती वेळ, दिरंगाई झाल्यास दशकभरात मुंबईत राहणं मुश्किल होईल, आदित्य ठाकरेंचा इशारा

वातावरण बदलाच्या परिणामांचे सर्वाधिक धोके असलेल्या शहरांपैकी मुंबई एक शहर असल्याने, मुंबईच पहिला वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केला.

हीच ती वेळ, दिरंगाई झाल्यास दशकभरात मुंबईत राहणं मुश्किल होईल, आदित्य ठाकरेंचा इशारा
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 7:29 PM

मुंबई : वातावरण बदलाच्या परिणामांचे सर्वाधिक धोके असलेल्या शहरांपैकी मुंबई एक शहर असल्याने, मुंबईच पहिला वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केला. हा आराखडा भविष्याचे अधिक चांगले नियोजन आणि वाढ राखत, वातावरणाशी अनुकूलता, धोके कमी करणे आणि सक्षमतेची खात्री देतो. (This is the time, if it is delayed, it will be difficult to stay in Mumbai after a decade, Aditya Thackeray)

डिसेंबर 2020 मध्ये मुंबई सी 40 शहरांच्या जाळ्यामध्ये (सी 40 सिटी नेटवर्क) सहभागी झाले असून शहराचा वातावरण कृती आराखडा 2021 च्या अखेरीस तयार होईल. सी 40 ची मार्गदर्शक तत्त्वे आणि महत्वाकांक्षी निकषांना अनुसरुन हा आराखडा तयार होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय) यांच्या तांत्रिक सहकार्याने हा आराखडा विकसित करत आहे. डब्ल्यूआरआय हे यामध्ये नॉलेज पार्टनर म्हणून कार्यरत आहेत.

तज्ज्ञ आणि नागरिकांकडून सूचना स्वीकारण्यासाठी शुक्रवारच्या कार्यक्रमात ठाकरे यांनी मुंबई वातावरण कृती आराखड्याच्या (एमकॅप) संकेतस्थळाचे उद्घाटन केले. याद्वारे तज्ज्ञ आणि नागरिक त्यांच्या सूचना, शिफारशी २० सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवू शकतील. मुंबई वातावरण कृती आराखड्याच्या अंतर्गत असलेले संकल्पनाधारीत सहा कृती मार्ग, उपाय नोव्हेंबर 2021 पर्यंत म्हणजेच संयुक्त राष्ट्रे वातावरण बदल परिषदेच्या (युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉनफरन्स – COP26) नजीकच्या काळात तयार होण्याची शक्यता आहे.

हीच वेळ कृती करण्याची!

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, आत्ता हीच वेळ कृती करण्याची असून, त्यात दिरंगाई झाली तर पुढील दशकभरात मुंबई शहर राहण्यासाठी अयोग्य ठरेल. ‘मुंबईच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करतानाच वातावरण बदलांबाबतची कृती मुख्य प्रवाहात आणल्यामुळे शहरातील नैसर्गिक रचनेचे संरक्षण, संवदेनशील समूहाची सक्षमता वाढवणे आणि शहराची समृद्ध वाढ होणे शक्य होऊन शहरातील हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात प्रभावी घट करता येईल.’ असे ते म्हणाले.

वातावरण बदलाचे आव्हान हाताळण्यासाठी व्यापक आणि सर्वसमावेशक असे धोरण तयार करणे हे या आराखड्याचे मुख्य उद्दीष्ट असल्याचे ठाकरे यांनी यावेळी मांडले. त्यासाठी वातावरण बदलाचे धोके कमी करणारे ठोस, प्रभावी आणि सर्वसमावेशक असे अनुकूल धोरण स्वीकारले जाईल.

या कार्यक्रमासाठी ठाकरे यांच्याबरोबर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त आयएस चहल, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, सी 40 सिटीजच्या दक्षिण आणि पश्चिम अशिया विभागाच्या विभागीय संचालक श्रुती नारायण, डब्ल्यूआरआयचे कार्यकारी संचालक माधव पै आणि डब्ल्यूआरआय इंडिया रॉस सेंटर ऑफ सस्टेनेबल सिटीजच्या सहयोगी संचालक लुबैना रंगवाला, राज्याचे पर्यावरण व पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री यांचे संशोधन व धोरण सचिव (खासगी) सौरभ पुनमिया आणि महानगरपालिकेचे उप आयुक्त (पर्यावरण) सुनिल गोडसे हे उपस्थित होते.

मुंबई वातावरण कृती आराखडा

हा आराखडा सहा प्रकारच्या कृती मार्गांवर, उपायांवर लक्ष्य केंद्रीत करतो. ज्यायोगे विविध क्षेत्रांच्या अनुषंगाने धोके कमी करणाऱ्या अनुकूल अशा विशिष्ट धोरणामुळे अंमलबजावणी करण्याजोगे वातावरण प्रकल्प शहराच्या सक्षमतेत मदत करतील. घन कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन, शहरातील हिरवळ आणि जैवविविधता, शहरातील पूर आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन, उर्जा कार्यक्षमतेची उभारणी, स्वच्छ हवा आणि शाश्वत वाहतूक यंत्रणा हे सहा संकल्पनाधारीत कृती मार्ग आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयएस चहल म्हणाले, “वातावरणीय बदलाच्या ताज्या घडामोडी पाहील्या तर आपल्या विचारात बदल करण्याची गरज आहे. नोंदी आणि माहितीवर देखरेख आणि व्यवस्थापन हे अचूक माहितीवर आधारलेले तातडीचे निर्णय घेण्यास उपयुक्त ठरेल. जेणेकरुन शहरातील सर्वाधिक संवेदनशील घटकांच्या सुरक्षेची खात्री देता येईल. कोरोना महामारीमध्ये मुंबईचा दृष्टीकोन असाच होता.”

आराखड्याच्या मांडणीसाठी मुंबईतील हरितगृह वायूंचे प्रमाण हे जागतिक निकषांचा वापर करुन काढण्यात आले आहे. त्यानुसार 2030 आणि 2050 मध्ये उत्सर्जन घटविण्याच्या धोरणांचा मार्ग शोधला आहे. वातावरणीय बदल आव्हानाच्या परिस्थितीनुसार शहराच्या संवेदनशीलता मूल्यांकनासाठी उपग्रहाधारीत प्रतिमांचा वापर करुन गंभीर जोखमीचे घटक शोधले आहेत.

इतर बातम्या

बाहेर शिवसेना-राणेंमध्ये राडा, फडणवीस-मुख्यमंत्र्याची बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण

राजकारणात वातावरण बदल होतोय, काही विषाणुही येतायेत, आमच्यासाठी विषय संपला: आदित्य ठाकरे

आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ; नारायण राणे कडाडले

(This is the time, if it is delayed, it will be difficult to stay in Mumbai after a decade, Aditya Thackeray)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.