फक्त रविंद्र वायकर नाही, ‘या’ विरोधकांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा, आरोपांनंतर कुणी-कुणी सत्ताधारी पक्षांत प्रवेश केला?

ठाकरेंचे आमदार रविंद्र वायकरांवर 9 जानेवारीला ईडीचा छापा पडला, तेव्हाच त्यांच्यावर भाजपकडून शिंदे गटात येण्याचा दबाव असल्याचा आरोप झाला. काल रविंद्र वायकर ठाकरेंसोबत होते. शिवसैनिकांसमोर त्यांनी भाषणही केलं. मात्र त्याच्या 24 तासाच्या आतच रविंद्र वायकरांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

फक्त रविंद्र वायकर नाही, 'या' विरोधकांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा, आरोपांनंतर कुणी-कुणी सत्ताधारी पक्षांत प्रवेश केला?
Follow us
| Updated on: Mar 10, 2024 | 11:07 PM

मुंबई | 10 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे काल रात्री ज्या रविंद्र वायकरांनी उद्धव ठाकरेंसोबत सभा घेतली, तेच आमदार 24 तासांच्या आत शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. गेल्याच महिन्यात आमदार रविंद्र वायकरांवर ईडीचे छापे पडले होते. विशेष म्हणजे त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप भाजपनंच केला होता. तेच वायकर आता शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजपचे सत्तेतील सहकारी असणार आहेत. दरम्यान, ठाकरेंचे आमदार रविंद्र वायकरांवर 9 जानेवारीला ईडीचा छापा पडला, तेव्हाच त्यांच्यावर भाजपकडून शिंदे गटात येण्याचा दबाव असल्याचा आरोप झाला. काल रविंद्र वायकर ठाकरेंसोबत होते. शिवसैनिकांसमोर त्यांनी भाषणही केलं. मात्र त्याच्या 24 तासाच्या आतच रविंद्र वायकरांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबईतल्या जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर हे उद्धव ठाकरेंच्या एकनिष्ठ आमदारांपैकी एक होते. त्यांच्यावर भाजपनं कथित जोगेश्वर भूखंड घोटाळ्याचा आरोप केला. या प्रकरणात गेल्याच महिन्यात ईडीचे छापेही पडले. वायकरांना तुरुंगात जावं लागेल, असा इशारा भाजप नेते देत होते. मात्र आता तेच वायकर शिंदेंसोबत भाजपचेच सत्तेतील सहकारी बनल्यानं भाजपची भूमिका काय? याची प्रतिक्षा आहे.

शिंदे-भाजप सरकार सत्तेत आल्यापासून आतापर्यंत उद्धव ठाकरेंकडच्या कोणकोणत्या नेत्यांमागे चौकशीचा फेरा लागलाय ते पाहूयात

  • खासदार संजय राऊतांवर ईडी कारवाई आणि अटक
  • आमदार वैभव नाईकांची मालमत्ता प्रकरणात एसीबी चौकशी
  • आमदार राजन साळवींचं घर-हॉटेल संदर्भात एसीबीची चौकशी
  • बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपात आमदार नितीन देशमुखांची चौकशी
  • कथित कोव्हिड घोटाळ्यात किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी
  • सुरज चव्हाणांची ईडी चौकशी
  • मुंबईतील ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकरांची चौकशी
  • गैरव्यवहाराच्या आरोपात नाशिकच्या अद्वय हिंरेवर गुन्हा आणि अटक
  • नाशिकच्या सुधाकर बडगुजरांवर सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचा आरोप आणि जुन्या प्रकरणात कारवाई
  • आमदार रविंद्र वायकरांच्या कथित घोटाळ्याच्या आरोपात ईडी छापे, त्यांचा आज शिंदे गटात प्रवेश झाला.
  • याआधी ठाकरे गटाच्या राहुल कनालांवर गैरव्यवहाराचे आरोप झाले, त्यांनी सुद्दा शिंदे गटात प्रवेश केलाय
  • दुसरीकडे राष्ट्रवादी फुटीनंतर आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोला प्रदूषण मंडळाची नोटीस
  • आमदार जयंत पाटलांच्या बंधूंना ईडीची नोटीस
  • 9 जानेवारीला रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीचे छापे आणि परवा रोहित पवारांचा साखर कारखान्याची संपत्ती ईडीनं जप्त केलीय

भाजपनं आरोप केलेले आणि नंतर भाजपामध्येच वा त्यांच्या मित्रपक्षात गेल्या काही दिवसात कोण-कोण गेलं?

  • अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळ्यासहीत भाजपनं विविध आरोप केले, काही दिवसांपूर्वीच भाजप प्रवेश करुन ते राज्यसभेचे खासदार बनलेयत
  • 9 जानेवारीला ठाकरेंचे आमदार वायकरांकडे ईडीचा छापा पडला, दीड महिन्यानंतर वायकर शिंदे गटात गेले आहेत
  • 10 नोव्हेंबरला बीडच्या कुटे समुहावर आयकरचा छापा पडला, त्याच्या १ महिन्यानंतर कुटेंनी भाजपात प्रवेश केला

याआधी अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, अर्जुन खोतकर, भावना गवळी, प्रताप सरनाईक, राहुल कनाल, यामिनी जाधव, अर्जुन खोतकर, यशवंत जाधव, संजय राठोड, आनंदराव अडसूळांसहीत अनेक नेत्यांवर भाजपनं जे आरोप केले होते, तेच नेते नंतरहून भाजपात किंवा भाजपसोबत सत्तेत गेले. त्यामुळे त्यांच्यावरचे आरोप खरे होते की खोटे? असा सवाल विरोधक करत आहेत.

'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.