बिनविरोध निवडून येणार म्हणून शिवसेना शाखाप्रमुखावर गोळीबार, तिघांना अटक

ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकीय वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी दिली.

बिनविरोध निवडून येणार म्हणून शिवसेना शाखाप्रमुखावर गोळीबार, तिघांना अटक
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 9:39 PM

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील काल्हेर इथं शिवसेनेचे शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना 3 जानेवारी रोजी घडली होती. या घटने प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. विकी उर्फ सोनु प्रकाश म्हात्रे, प्रथम किशोर भोईरआणि वैभव विजय भोकरे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकीय वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी दिली. (Three arrested for firing on Shiv Sena branch chief dipak mhatre in bhiwandi)

म्हात्रे हे पत्नीसह घरासमोरील परिसरात आपल्या भावाने घेतली गाडी बघत होते. तेव्हाच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. मात्र, म्हात्रे यांनी प्रसंगावधान राखत गोळी चुकवली आणि पत्नीलाही सुरक्षित ठिकाणी नेले. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडणूक करून आदर्श गाव सिद्ध करण्याचा मनसुबा दीपक म्हात्रे आणि त्यांची पत्नी यांनी उमेदवारी अर्ज भरून बिनविरोध निवडीला खो घातला.

याचाच राग मनात ठेवून ही घटना घडवून आणल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आल्यानंतर पोलीस व गुन्हे शाखेचे पथक या घटनेचा समांतर तपास करीत होते. गुन्हे शाखा भिवंडी युनिटच्या पथकाने गुप्त बातमीदारामार्फत या घटनेतील आरोपींबाबत माहिती मिळवली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी तिघांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. अटकेतल्या आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहावे या कारणातून विकी उर्फ सोनु प्रकाश म्हात्रे आणि त्याचे साथीदार यांनी दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार केल्याचे पोलीस तपासातून समोर आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी दिली. (Three arrested for firing on Shiv Sena branch chief dipak mhatre in bhiwandi)

संबंधित बातम्या – 

शिवसेनेची कोंडी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी भाजप एकवटले, गटनेत्यांकडून आयुक्तांची भेट

Rekha Jare हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय, बाळ बोठेविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी

(Three arrested for firing on Shiv Sena branch chief dipak mhatre in bhiwandi)

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.