अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देताना काळजी घ्या, या व्यक्तीला लिफ्ट देणे आले अंगलट

Mumbai Crime News | रस्त्यातवर लिफ्ट मागताच अनेक जण गाडी थांबवून लिफ्ट देतात. परंतु मुंबईतील एका व्यक्तीला लिफ्ट देणे चांगलेच अंगलट आले. लिफ्ट मागणाऱ्यांसाठी गाडी थांबवल्यावर तिघांनी जबरदस्तीने गाडीचा ताबा घेतला. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि गाडी घेऊन पसार झाले.

अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देताना काळजी घ्या, या व्यक्तीला लिफ्ट देणे आले अंगलट
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 9:16 AM

सुनील जाधव, मुंबई, दि. 6 जानेवारी 2024 | रस्त्यावर आपण अनेकांना लिफ्ट देत असतो. एकमेकांना मदत करणे हा चांगला उद्देश असतो. परंतु एका व्यक्तीला लिफ्ट देणे चांगलेच अंगलट आले. त्या व्यक्तीला काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या पलावा-खोणी जवळ तीन जणांनी मिळून लुटले. आम्हाला वाशी येथे जायचे आहे, लिफ्ट द्या असे सांगून त्याच्या कारमध्ये बसले. आपण वाशी जात नसल्याचे सांगितल्यावर ते कारमध्ये बसले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून चालकाच्या जवळील रोख रक्कम काढून घेतली. चालकाला जबरदस्तीने कारमधून ढकलून तिघे लुटारू कारसह फरार झाले. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. “नेकी कर दरिया में डाल” या हिंदी म्हणीप्रमाणे हा प्रकार घडला.  या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरु आहे.

काय घडला प्रकार

मुंबई येथील धारावीत राहणारे सचीन फुलचंद शाव (20) हे त्यांच्या कारने काटई-बदलापूर रोडने दुपार जात होते. यावेळी पलावा-खोणी भागातून जात असताना सचिन याला तीन जणांनी हात दाखवून थांबविले. आम्हाला वाशी येथे जायचे आहे, असे बोलून तिघे कारमध्ये बसले. त्यांनी आपण वाशी येथे जात नसल्याचे सांगितल्यावरही ते तिघे जबरदस्तीने बसले. कारमध्ये बसल्यानंतर त्यातील एकाने चाकूचा धाक दाखविला. जास्त आवाज केला तर तुला भारी पडेल, अशी धमकी दिली. मात्र कारचा ताबा सोडण्यास तयार नसल्याचे पाहून तिघा लुटारूंनी सचिन शाव यांना बेदम मारहाण केली. त्यातील एकाने त्यांना जबरदस्तीने कारमधून उतरवून स्वतः कारचे स्टिअरिंग ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा

रोख रक्कम आणि ऐवज नेला

सचिन शाव यांच्या जवळ असलेलेी दीड हजार रूपये रोख रक्कम त्यांनी नेला. तसेच त्यांची कार असा एकूण 2 लाखांहून अधिक रकमेचा ऐवज घेऊन लुटारू पसार झाले. या प्रकरणी सचिन शाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गोरे आणि त्यांचे सहकारी लुटारुंचा शोध घेत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.