देशाच्या राजकारणातील ‘या’ दिग्गजांनी माफी मागून वाचवलेली आपली खुर्ची, तिसरं नावं वाचून व्हाल अवाक!

राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने काही दिवसांपूर्वीं ‘सर्वच मोदी चोर असतात’ या वक्तव्यावरून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जामीनावर गांधी बाहेर आले मात्र लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केलीय.

देशाच्या राजकारणातील 'या' दिग्गजांनी माफी मागून वाचवलेली आपली खुर्ची, तिसरं नावं वाचून व्हाल अवाक!
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 10:53 PM

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने काही दिवसांपूर्वीं ‘सर्वच मोदी चोर असतात’ या वक्तव्यावरून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जामीनावर गांधी बाहेर आले मात्र लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केलीय. मात्र देशाच्या राजकारणातील काही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्यानंतर माफी मागून आपली खुर्ची वाचवली होती.

2015 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आप नेते संजय सिंह आणि माजी नेते आशुतोष यांच्यावर भाजप नेते अरुण जेटली यांनी 10 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला होता. केजरीवाल यांनी 3 वर्षांनंतर 2018 मध्ये लेखी माफी मागितल्यानंतर हे प्रकरण मागे घेण्यात आले. तसंच आणखी एका प्रकरणात केजरीवाल यांनी नितीन गडकरी आणि कपिल सिब्बल यांची माफी मागितली आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह विरुद्ध उमा भारती बदनामी प्रकरणाचीही खूप चर्चा झाली होती. दिग्विजय सिंह यांनी मुख्यमंत्री असताना 2003 च्या विधानसभा निवडणुकीत 1500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप उमा भारती यांनी केला होता.  मात्र, नंतर त्यांनी माफी मागितली.

2013 मध्ये एका टीव्ही मुलाखतीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर शीला दीक्षित यांचे राजकीय सचिव असलेले पवन खेडा यांनी मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या वतीने मानहानीचे अनेक खटले दाखल करण्यात आले होते. यामध्ये एम करुणानिधी यांच्यावरील मानहानीच्या खटल्याची बरीच चर्चा झाली होती. जयललिता यांनी  2012 मध्ये करुणानिधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. तसंच जयललिता यांनी डीएमडीके नेते विजयकांत यांच्याविरोधातही मानहानीचा खटला दाखल केला होता.

2013 मध्ये जेडीयू नेत्याने आरजेडी प्रमुख लालू यादव यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. लालू यादव यांनी 15 मे रोजी पाटणा येथे एका सभेला संबोधित करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच त्यावेळी एमएलसी असलेले संजय सिंह आणि संजय झा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.  नंतर याप्रकरणी त्यांनी माफी मागितल्यानंतर हे प्रकरण बंद करण्यात आले.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.