आता राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक; मोठे निर्णय घेणार

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जागा वाटपाचं सूत्र ठरणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आता राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक; मोठे निर्णय घेणार
nana patoleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 12:49 PM

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड विजय मिळाला आहे. तर भाजपचा दणकून पराभव झाला आहे. त्यामुळे विरोधकांचं बळ वाढलं आहे. कर्नाटकातील विजयानंतर महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर आज महाविकास आघाडीने एक तातडीची बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मोठे निर्णय घेतले जाणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच त्याचं सुतोवाचही केलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून स्वत: शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तसेच काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहे. दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असावा? यावर आज महाविकास आघाडीच्या बैठकीत प्राथमिक चर्चा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

फूट पडू नये म्हणून

लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे 10 महिने राहिले असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यूहरचना आखण्यास तयारी सुरू केली आहे. जागा वाटपातील संभाव्य मतभेदांमुळे महाविकास आघाडीत फूट पडून त्याचा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना निवडणुकीत फायदा होऊ नये यासाठी आतापासूनच महाविकास आघाडीचे नेते सावध आहेत, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

रणनीती ठरवली जाईल

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या बैठकीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज संध्याकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. 2024च्या दृष्टीने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती काय असेल? जागा वाटपाचं सूत्रं काय असेल हे ठरवलं जाईल. लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल. सर्व नेते भेटणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

पुरा देश बाकी है…

इंदिरा गांधींच्या बाबतीत जे झालं तेच आता होत आहे. कर्नाटक तो झांकी है पुरा महाराष्ट्र नही, पुरा देश बाकी है. महाराष्ट्र हे लुटीचं राज्य आहे. फार काळ त्यांच्याकडे राहणार नाही. जे कर्नाटकात झालं. तेच महाराष्ट्रात होईल, असं राऊत म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.