TOP 9 Headlines | 28 Feb 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
What's App Bulletin : राज्यात आज संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारनं लेखी आश्वासन दिल्यावर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी केलेलं उपोषण मागं घेतल. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
- राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य, सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यासंह कोपर्डी प्रकरणी राज्य सरकारकडून कालबद्ध कार्यक्रम, लेखी आश्वासनानंतर अखेर खासदार संभाजी छत्रपतींकडून उपोषण तिसऱ्या दिवशी मागे, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अमित देशमुख यांच्यासह राहुल शेवाळे, विजय शिवतारे संभाजी छत्रपतींच्या भेटीला संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील वक्तव्यानंतर वातावरण तापलं, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आक्रमक, गरज पडली तर तुमचं धोतर फेडू, राज्यपाल महोदय माफी मागा! मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांचा इशारा संपूर्ण बातमी मला माहिती असलेल्या इतिहासावर वक्तव्य केलं, नव्या तथ्यानुसार पुढे पाहिल, माफीच्या मागणीबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलणं टाळलं संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
- रशिया आणि यूक्रेन यांच्यात बेलारुसमध्ये चर्चा सुरु, रशियाची अणवस्त्र हल्लाची तयारी, कोणत्याही क्षणी हल्ल्याची शक्यता, तर, रशियाला रोखण्यासाठी युक्रेनचा मास्टर स्ट्रोक, जेलमधील कैदी युद्धभूमीवर उतरणार संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
- यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी उच्च स्तरीय प्रयत्न, युक्रेनशेजारील देशात केंद्रीय मंत्र्यांचं पथक जाणार, जोतिरादित्य सिंधिया, किरीन रिजीजू यांचा समावेश संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
- मुंबई पोलीस दलात खांदेपालट, संजय पांडे यांची आयुक्तपदी नियुक्ती, तर हेमंत नगराळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
- महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर ‘ऑपरेशन सह्याद्री’ असतं; ‘ऑपरेशन गंगा’वरून संजय राऊत यांचा केंद्राला टोला, तर, केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर आणि वसूली गँग विरोधात पीएमओकडे तक्रार, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
- शिवसेना नेते यशवंत जाधव यांची इन्कम टॅक्स चौकशी चौथ्या दिवशी संपली, तर, प्राजक्त तनपुरे यांना ईडीकडून धक्का, राम गणेश गडकरी साखर कारखान्याची जमीन जप्त, वाचा संपूर्ण बातमी
- शेतातले साप थेट शासकीय कार्यालयांमध्ये, शेतकऱ्यांच्या अजब प्रकाराची राज्यभर चर्चा, शेतीसाठी दिवसा वीज मिळावी म्हणून शेतकरी आक्रमक, संपूर्ण बातमी आता राज्यात वीज निर्मिती केंद्र तिथे जैवविविधता उद्याने, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा, संपूर्ण बातमी वाचण्यसाठी किल्क करा
- नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण, मुंबई सत्र न्यायालय उद्या निकाल जाहीर करणार, निकालाकडे सर्वांच्या नजरा, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
इतर बातम्या:
जर खरोखरंच पुतिननं यूक्रेनवर अणूबाँब टाकला तर काय काय होऊ शकतं? किती राखरांगोळी होईल?