Anil Parab on st bus workers strike : पैसे देऊन संप चालू राहणार असेल तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट, आता सरकारला विचार करावाच लागेल; परब यांचा इशारा
पैसे देऊन संप चालू राहणार तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट आहे. असा विचार सरकार करू शकतो. त्यामुळे आम्ही चार पावलं पुढे आलोय. दोन पावलं तुम्ही मागे व्हा, असे आवाहन अनिर परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देऊनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटीचे विलिनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम राहत एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरु ठेवला आहे. यामुळे आता अनिल परब यांनीही कडक भूमिका घेतल्याचे दिसतेय. पैसे देऊन संप चालू राहणार असेल तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट असे बोलत आता सरकारला विचार करावाच लागेल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. संप मिटवण्यासाठी आज अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समिती यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर अनिर परब बोलत होते.
अनिल परब काय म्हणाले?
आज महाराष्ट्र सरकार चार पावलं पुढे आलं आणि भरघोस वेतन वाढ दिली आहे. केवळ एका मुद्द्यासाठी जो मुद्दा सरकारच्या हातात नाही. कोर्टाच्या समितीच्या हातात आहे. अहवाल आल्यावर त्यावर विचार होईल. त्यांना स्पष्ट सांगितलं. तो पर्यंत एसटी बंद ठेवणं कर्मचारी, सरकार आणि ग्राहकांना परवडणारं नाही. जेव्हा कामकाज सुरू होईल. तेव्हा छोट्यामोठ्या गोष्टींवर चर्चा होईल. पण आर्थिक भार सोसायचं आणि एसटी बंद ठेवायची असं होणार नाही. सरकारला विचारच करावा लागेल. पैसे देऊन संप चालू राहणार तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट आहे. असा विचार सरकार करू शकतो. त्यामुळे आम्ही चार पावलं पुढे आलोय. दोन पावलं तुम्ही मागे व्हा, असे आवाहन अनिर परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.
कोणावरही अन्याय होणार नाही, पण बेशिस्तपणाही खपवून घेतला जाणार नाही
राज्य सरकारने तोडगा काढून पगारवाढ केली. अनेक कामगारांनी कामावर येण्याची इच्छा व्यक्त केली, रुजूही झाले. एसटी संघटना कृती समिती यांच्याशी चर्चा झाली. त्यांना दिलेली पगारवाढ ही मूळ वेतनात दिलेली असल्याने त्यांच्या श्रेणीत तफावत निर्माण झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. संप मिटल्यावर यावर विचार करता येईल, कोणावरही अन्याय होणार नाही. पण बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही ही सुद्धा जाणीव त्यांना करून दिली. सातवा वेतन आयोग लागू करून 10 वर्षांचा करार करावा, अशी मागणी आली त्यावरही विचार करू. हा करार खरं तर 4 वर्षांचा असतो मात्र 10 वर्षांच्या करारावर नक्कीच विचार करू. मात्र तोपर्यंत एसटी बंद ठेवणं कर्मचाऱ्यांना, सरकारला आणि प्रवाशांनाही परवडणारे नाही, असे अनिल परब म्हणाले. (Transport Minister Anil Parab reaction on St worker strike and their demand)
संबंधित बातम्या
सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर संप मिटणार?; कर्मचारी संघटना आणि अनिल परब यांच्यात चर्चा सुरू