Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो!

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी 27 जुलै 2020 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो!
Tulsi Lake
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 1:07 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी 27 जुलै 2020 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता (Tulshi Lake which supplies water to Mumbai overflows).

8046 दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष 2019 मध्ये दिनांक 12 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष 2018 मध्‍ये दिनांक 9 जुलै रोजी; वर्ष 2017 मध्‍ये दिनांक 14 ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष 2016 मध्‍ये 19 जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरुन वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

तुळशी तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे

? बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 35 किलोमीटर (सुमारे 22 मैल) अंतरावर हा तलाव आहे.

? या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन 1879 मध्ये पूर्ण झाले.

? या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

? या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.76 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 1.35 चौरस किलोमीटर एवढे असते.

? तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा 804.56 कोटी लीटर एवढा असतो. (8046 दशलक्ष लीटर)

? हा तलाव पूर्ण भरुन वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.

Tulshi Lake which supplies water to Mumbai overflows

संबंधित बातम्या :

Mumbai Traffic : मुंबईत पावसाची दाणादाण, ट्रॅफिक जाम झाल्यानं ठिकठिकाणी गाड्यांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Rains: मुंबईत पावसाचं धुमशान, पाणी भरलं, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.