अजित पवार आणि शरद पवार यांच्यात संघर्ष कधीपासून? जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट काय?

"अजित पवार गटाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा मला माहिती नव्हतं. त्यादिवशी त्यांनी सर्व आमदारांना बोलवून बैठक बोलावली होती. त्यावेळी बऱ्याच आमदारांचा मला फोन आला. आम्ही तिकडे जातोय. जाऊ का? मी म्हटलं त्यांनी बोलावलं आहे तर जा", असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात संघर्ष कधीपासून? जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट काय?
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 3:50 PM

मुंबई | 1 मार्च 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘लोकसभेचा महासंग्राम‘ या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या गेल्या काही महिन्यांपासूनच्या सुरु असलेल्या घडामोडींवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आधीपासून संघर्ष दिसत होता का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कोणताही संघर्ष जाणवत नव्हता. दोघांमध्ये इतकं चांगलं अंडरस्टँडींग होतं की, शरद पवार आणि अजित पवार सांगतील त्याप्रमाणेच बहुतेक निर्णय व्हायचे. त्यामुळे दोघांमध्ये कधीही संघर्ष जाणवला नाही”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटील हे भावूक झाले होते. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “मी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम करत होतो. शरद पवारांनी पक्ष ज्यावेळेला वेगळा करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पक्ष सोडून जे आले त्यांच्यामध्ये मी नव्हतो. कारण पक्ष बदलू नये या मताचा मी होतो. पण त्यानंतर आग्रह झाला, चर्चा झाल्या. या पक्षात शरद पवार यांचं नेतृत्व आहे म्हणून मी या पक्षात आलो. आता 25 वर्षे त्यांच्या नेतृ्त्वाखाली काम करताना त्यांच्या नेतृत्वाची एवढी सवय झाली की, त्यांच्याशिवाय राजकारण करणं अशक्य आहे. तेच जर निघून जायला लागले तर मग हे 25 वर्षे आम्ही सगळ्यांनी खर्च केले ते व्यर्थ आहे, अशी भावना होती”, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. “ज्यांना पक्ष चालवायची इच्छा होती त्या सर्वांना द्यावं, अशी माझी भूमिका होती”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

‘अजित पवार गटाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा…’

“अजित पवार गटाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा मला माहिती नव्हतं. त्यादिवशी त्यांनी सर्व आमदारांना बोलवून बैठक बोलावली होती. त्यावेळी बऱ्याच आमदारांचा मला फोन आला. आम्ही तिकडे जातोय. जाऊ का? मी म्हटलं त्यांनी बोलावलं आहे तर जा. जायला काहीच हरकत नाही. मी माझ्या घरी आहे. तुमचं तिकडचं काम झाल्यावर माझ्याकडे या. काही आमदार मंत्री झाले त्यांनीही फोन केले. मी सर्वांना जा सांगितलं. त्याच्याआधी काही दिवस आधी अजित पवारांनी पक्षाची काही जबाबदारी द्या, अशी मागणी जाहीर व्यासपीठावर केली होती. त्यामुळे सगळ्यांना असं वाटलं की त्यासाठी बोलवत आहेत. त्याठिकाणी त्यांनी जाऊन कशावर आमदारांच्या सह्या घेतल्या ते बहुतेकांना माहिती नव्हतं. सगळ्यांनी ते म्हणतील तिथे सह्याही केल्या. त्यानंतर ते राजभवनात गेले”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.