Tv9 मराठी EXCLUSIVE | शिवसेना शिंदे गटाच्या गोटातली आतली बातमी, 2 मंत्र्यांना लोकसभेत उतरवण्याची तयारी

शिंदे गटाच्या लोकसभेच्या जागांबाबतची एक्सक्लुझिव्ह माहिती 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागली आहे. शिंदे गट लोकसभा निवडणुकीसाठी नेमक्या किती जागांचा प्रस्ताव देणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळातील दोन बड्या मंत्र्यांना शिंदे गट लोकसभेच्या रणांगणात उतरवण्याच्या तयारी असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी 'टीव्ही 9 मराठी'ला दिली आहे.

Tv9 मराठी EXCLUSIVE | शिवसेना शिंदे गटाच्या गोटातली आतली बातमी, 2 मंत्र्यांना लोकसभेत उतरवण्याची तयारी
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 6:44 PM

मोहन देशमुख, इनपूट एडिटर, Tv9 मराठी, मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 :  देशाची लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात सध्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांकडून वेगवेगळ्या जागांवर दावा केला जातोय. विशेष म्हणजे महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. तर सत्तेत सध्या 3 महत्त्वाचे पक्ष आहेत. त्यामुळे या जागावाटपाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. असं असताना आता शिंदे गटाच्या गोटातली इनसाईड बातमी ‘टीव्ही 9 मराठी‘च्या हाती लागली आहे. शिवसेना शिंदे गटाचा लोकसभेच्या निवडणुकीसाठी 18 जागांवर दावा आहे. खात्रीलायक सूत्रांनी याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे. शिंदे गट लवकरच 18 जागांचा प्रस्ताव पाठवणार आहे. तसेच शिंदे गट महाराष्ट्र मंत्रिमंडळातील 2 मंत्र्यांना थेट लोकसभेच्या निवडणुकीत उतरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक आणखी रंजक होण्याची चिन्हं दिसत आहेत.

शिंदे गटाच्या गोटातली आतली बातमी नेमकी काय?

शिंदे गटाच्या लोकसभेच्या जागांबाबतची एक्सक्लुझिव्ह माहिती ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. शिंदे गट लोकसभेसाठी 18 जागांचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गट 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर जिंकलेल्या 18 जागांवर दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच शिंदे गट 2 मंत्र्यांना लोकसभेत उतरवण्याच्या तयारीत आहे, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधून मंत्री संदीपान भुमरे, धाराशीवमधून मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. संदीपान भुमरे हे सध्या राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री आहेत. तर तानाजी सावंत हे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. या दोन्ही नेत्यांना आता लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिंदे गटाकडून चाचपणी सुरु आहे.

‘या’ दोन महत्त्वाच्या मतदारसंघांवर शिंदे गट दावा करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना 18 जागांवर ठाम आहे. शिंदे गट महायुतीत 18 जागांचा लवकरच प्रस्ताव देणार आहे, अशी माहिती सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. शिवसेनेकडच्या 13 खासदारांसह 5 विनिंग जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. छत्रपती संभाजीनगर, धाराशीव लोकसभा मतदारसंघांवर शिवसेना दावा करणार आहे. शिंदेंची शिवसेना दक्षिण मुंबई, सिंधुदुर्ग –रत्नागिरी, परभणी जागेवरही दावा करणार आहे. आमच्या 5 विनिंग जागा असल्याचा शिवसेनेचा दावा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे गटाविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धाराशीवमधून तानाजी सावंत यांच्या नावाची चाचपणी सुरु आहे. तर संभाजी नगरातून संदीपान भुमरेंच्या नावाची चाचपणी आहे. शिंदे गटाची पाचही ठिकाणी ठाकरे गटाविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी आहे. शिंदे गटाकडून संभाजीनगर, धाराशीव मतदारसंघात खासगीत सर्व्हे करण्यात आलाय. तर परभणीतून अर्जुन खोतकरांच्या नावाची चाचपणी सुरु आहे. दक्षिण मुंबई, सिंधुदुर्ग – रत्नागिरीत लोकांची मतं जाणून घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.